बद्धकोष्ठता | पोट साफ न होणे | डॉ .श्री .नितीन जाधव .संजीवन चिकित्सक .9892306092.

दिवसातून एकदा सकाळी  नियमित पोट साफ होणे हा निसर्गनियम आहे. अन्नाचा पोटातला मुक्काम एवढाच असतो. एवढया वेळात अन्न पचून त्याचा चोथा टाकायला तयार होतो. पोटात हा मळ जास्त काळ राहिला तर त्याला दुर्गंध येतो. रोज पोट पूर्ण साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.
न झाल्यास पोटाचे कार्य बिघडले कि परिणामी80 प्रकारच्या वेगवेगळ्या आजाराला सामोरे जाव लागते 
आहारातील पदार्थांचे प्रकार व प्रमाण
पोट साफ होण्यासाठी त्यात पालेभाज्या, कोंडा यांचे प्रमाण चांगले पाहिजे. काही पदार्थ जात्याच रुक्ष असतात व उदा  मैदा, मिठाई,बेसन बेकरी पदार्थ इ.रुक्ष आहाराने व बिस्किट  फरसाण, चणे, चुरमुरे, फुटाणे) तात्पुरते बध्दकोष्ठ होते. 
पदार्थांनी पोट लवकर साफ होत नाही.
आपल्या शरीराला लावलेली सवय व दिनचर्या पोट साफ होणे-न होण्याला कारणीभूत ठरते.
बध्दकोष्ठ हा बहुधा चुकीच्या आहार-विहार सवयींचा परिणाम असतो.


डॉ .श्री .नितीन जाधव .संजीवन चिकित्सक .9892306092.


🔴 उतारवयात गुदद्वाराच्या कर्करोगाची शक्यता मनात ठेवून एकदा तरी तपासणी केली पाहिजे.
🔴 कॉफी व चहा जास्त पिण्याने आतडी मंदावतात व बध्दकोष्ठ होते.
🔴  तंबाखूच्या बिडी सिगारेट  सेवनानेही बध्दकोष्ठता होते.
🔴 बध्दकोष्ठामुळे मळ कोरडा होऊन खडे तयार होतात यामुळे मळ बाहेर पडायला अवघड जाते.  
पोटाच्या डाव्या बाजूला हाताने दाबून आपल्याला मोठया आतडयाचा भरीव घट्ट-कडकपणा जाणवतो.
उपचार
🔴लहान मुलांना खडे होणे

लहान मुलांना बध्दकोष्ठ असेल तर एक सोपा उपाय करा.

एक-दोन चमचे तेलकट किंवा बुळबुळीत पदार्थ (उदा. गोडेतेल) गुदद्वारात भरल्यास आतले  मळाचे खडे 10-15 मिनिटांत बाहेर पडतात व दुखत नाही. यासाठी एरंडेल तेल, पॅराफिन (एक प्रकारचे पातळ मेण) किंवा साबणाचे पाणी वापरतात. हे फक्त एक-दोन चमचेच वापरायचे असल्याने हा एनिमा  नाही. (एनिमामध्ये पावशेर, अर्धा लिटर साबणाचे पाणी वापरतात.) मुलांना एनिमा देऊ नये.
किंवा
 आर्धा ते एक  चमचा एरंडाच तेल पोटात द्यावे 

आयुर्वेद
बध्दकोष्ठाचा त्रास अनेक जणांना होतो. उपायही अनेक आहेत.
🔴 एखादे वेळी 
मळाचे कोरडे खडे झाले असल्यास ते बाहेर पडण्यासाठी तोंडातून औषध देण्यापेक्षा गुदद्वारामार्फत उपाय करणे हा एक पर्याय आहे . यासाठी जुन्या मऊ सुती कापडाची सुरळी (करंगळीइतकी जाड) करून एरंडेल तेलात भिजवून गुदद्वारातून आत सरकवावी. रुग्णास स्वत:सही ही क्रिया जमू शकेल. यानंतर तीन-चार तास पडून राहण्यास सांगावे (किंवा हा उपाय झोपताना करण्यास सांगावे). यामुळे कोरडे खडे तेलकट होऊन बाहेर पडणे शक्य होते. लहान मुलांसाठी आणि वृध्दांसाठी हा उपाय फार चांगला ठरतो. याऐवजी तेलाची पिचकारीही चालेल.
🔴 बध्दकोष्ठासाठी पोटातून उपाय करायचा असल्यास 
15 ते 40 मि.ली. शेंगदाणा तेल  रात्री प्यायला द्यावे. त्यापाठोपाठ गरम पाणी  द्याव म्हणजे जिभेवर तेलकट चव राहणार नाही. या उपायानेही खडे सुटतात.
हे आठवड्यात मोठ्या ने  एकदा करावे 
🔴 ज्यांना वारंवार मळाचे खडे होतात त्यांनी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.  फुटाणे, टोस्ट, फरसाण, पापडीशेव, पिठले, डाळमोठ,चिवडा, इत्यादी मूलत: कोरडे असणारे पदार्थ वर्ज्य करावेत. याऐवजी पालेभाज्या,
मोडआलेले  मूग, मटकी, चवळी, 
हिरवे वाटाने गव्हांकुर इत्यादी चोथा-सालपटयुक्त व फायबर यूक्त आहार घेण  
पातळ पालेभाज़्या कारले भोपळा गाजर बिट टमाटा याचा रस  घेणे चांगले.आहे 
🔴 जागरण करणे तान तनावपूर्ण जीवन शैली  किंवा उशिरा झोपून उशिरा उठणे, हेही खडे होण्याचे कारण आहे. पहाटे उठून व्यायाम करणारे  मलविसर्जन करणार्याला  हा त्रास सहसा होत नाही. 
उपाय 1
🔴 त्रिफळा चूर्ण एक  चमचा + एक ग्लास दुध  गरम रात्री झोपताना द्यावे. त्रिफळा चूर्ण वारंवार घ्यायची वेळ आल्यास दर वेळेस 2-3 चमचे गाईच तुप   किंवा 2-3 चमचे एरंडाच्या तेलया बरोबर घ्यावे. 
उपाय 2
रोज सकाळी 
15 ml आवळ्याचे ज्युस किंवा 
याऐवजी 
एक लिंबाच्या रस एक ग्लास कोमट पाण्या सोबत घ्यावा 
व 15 ml कोरफडीचे ज्युस सोबत घ्यावे 
30 मि प्राणायाम  करावा 
व  मंडूकासन करावे  महत्वाचे आहे 

डॉ .श्री .नितीन जाधव .संजीवन चिकित्सक .9892306092.

Comments

Doctor

Image Gallery with Captions and Links
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
May all sentient beings be at peace, may no one suffer from illness, May all see what is auspicious, may no one suffer. Om peace, peace, peace.

Total Pageviews