कटिशूल

कटि म्हणजे कंबर व शूल म्हणजे दुखणे. कटिशूलची कारणे भरपूर आहेत ज्यावर आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. खूप वेळ एकाच जागी बसल्यामुळेही कंबर दुखू शकते. किंवा कंबर जखडल्यामुळे कुठचीही हालचाल करण्यास त्रास होणे सारख्या तक्रारी असू शकतात. हे कंबरेचे दुखणे नंतर पाठीचे दुखणे बनून अजूनही जास्त त्रास देऊ/वाढवू शकते. म्हणूनच एकाच जागी तासनतास बसून काम करणे शक्यतो टाळावे विशेषकरून जे ऑफिसमध्ये काम करतात ते सुद्धा वातानुकुलीत कक्षात बसून; विश्राम न करता कुठचीही गाडी सतत चालवणाऱ्या माणसांना, लांब पल्ल्याच्या मार्गावरून मोठ्या गाड्या चालविणे\ जसे कि truck किंवा tourist/travel bus ज्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणारे व खडबडीत रस्त्यावरून(गावातले रस्ते पण) भरधाव वेगाने गाड्या चालवणारया Drivers ना हे त्रास नेहमीच होत असतात. व वेळेत काळजी जर घेतली नाही तर हे दुखणे जुनाट होऊन भयंकर त्रासांना जन्म देते. मणके सटकू शकतात. दोन मणक्यांमधील झीज अतिप्रमाणात होऊन असह्य वेदना होऊ शकतात.

आता हे फक्त बसून काम करणाऱ्या व्यक्तींपुरतेच मर्यादित नसून सतत उभे राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा लागू होते जसे कि bus conductors, salesmans, डोक्यावर विकायच्या वस्तूंचा भार घेऊन दारोदारी जाऊन विकणारयाना, अगदी भाजीवाले सुद्धा व इतर. जास्त भाराचे(over weight/overload) वजन उचलल्यामुळे पण कंबर दुखू शकते. ह्यात construction site वरचे कामगार सुद्धा आले व Gym मध्ये bodybuilding व weightlifting चे डोक्यावर नसते भूत असणारे. Athletes व sportspersons(खेळाडु) सुद्धा ह्याच list मध्ये आले जे Fitness च्या नावावर विश्राम न करता व काळजी न घेता मर्यादेपेक्षा जास्त सराव व व्यायाम करतात. एवढेच नव्हे सर्वात महत्वाचे म्हणजे गृहिणीना तर हा त्रास होताच असतो कारण घर व परिवार सांभाळण्यासाठी सतत उठबस करता करता त्यांचा पूर्ण दिवस घरची कामे करण्यातच निघून जातो व आराम सुद्धा भेटत नाही. एखाद्यावेळेस जर विचित्र स्थिती मध्ये झोपावे लागले, नेहमीप्रमाणे मऊ व comfortable bed न मिळाल्यामुळे(छोट्या जागेत झोपल्यामुळे, Train/bus च्या प्रवासात शक्यतो हे त्रास होतात जेव्हा आपण sitting/semi sleeper मध्ये रात्रीचा प्रवास करतो विशेषकरून ज्यांना असल्या प्रवासाची सवय नसते त्यांना), जमिनीवर झोपावे लागल्याने इतर मुळे ही पाठ दुखू शकते.

ह्या सर्व तक्रारींसाठी मग आपण PainKillers घेतो कुठच्याही वैद्याच्या सल्ल्याशिवाय. थोड्या तासांपुरता त्रास कमी होईल ही पण त्या गोळ्यांचा effect संपल्यावर परत काय? आपण अशेच painkillers मग घेत राहतो. काय उपयोग त्यांचा? त्यांच्या अतिसेवनामुळे भलतेच त्रास चालू होतात मग. त्यापेक्षा ज्यागोष्टीमुळे हा त्रास होतोय, त्या कमी/बंद करणे महत्वाचे असे नाही का वाटत? शिवाय आहार व विहार सुद्धा व्यवस्थित असले पाहिजेत. शरीरात वात दोष वाढविणारे पदार्थ खाणे, त्या गोष्टींच्या/पदार्थांच्या संपर्कात राहणे, तश्या कृती करणे(विहार) शक्यतो टाळावेत किंवा कमी करावेत. चिकित्सेच्या दृष्टीने सांगायचे झाल्यास आयुर्वेदीय औषधांचा लाभ होतोच पण ती सुद्धा व्याधिचे व्यवस्थित निदान करूनच. एकच औषध सगळ्याच प्रकारच्या व्याधींमध्ये उपयोगी होईलच असे नसते. व्याधिच्या अवस्थेनुसार औषधे व चिकित्सा ही बदलते. पंचकर्म चा विशिष्ठ लाभ होतो. बस्ति चिकित्सा तर ह्या तक्रारींवर सर्वोत्तम. शिवाय स्नेहन-स्वेदन, कटी बस्ति सारख्या इतर पंचकर्मांचा ही उत्तम फायदा होतो. काही योगासने ह्या दुखण्यांसाठी फायदेशीर ठरतात. म्हणूनच काळजी घ्या स्वतःची व तपासणी करून योग्य वेळेस योग्य उपचार घ्या. Internet वरून स्वतःच्या त्रासांचे निदान करणे थांबवावे. तिथे सगळ्याच गोष्टी सापडू शकत नाहीत.


 डॉ. श्री. नितिन जाधव. संजीवन चिकित्सक .डोंबिवली. 9892306092.

Comments

Doctor

Image Gallery with Captions and Links
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
May all sentient beings be at peace, may no one suffer from illness, May all see what is auspicious, may no one suffer. Om peace, peace, peace.

Total Pageviews