ते आठविंता विसरे । कां तें विसरोन आठविजे । जाणोनियां नेणिजे । परब्रह्म तें ।।
।। दास-वाणी ।।
ते आठविंता विसरे ।
कां तें विसरोन आठविजे ।
जाणोनियां नेणिजे ।
परब्रह्म तें ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०७/०७/१९
ते म्हणजे परब्रह्म.
परब्रह्माची आठवण करायला गेलो तर
मायेपोटी त्याचा विसर पडतो.
त्याला पूर्ण विसरून जाऊ म्हटले तर
ते पुन्हा पुन्हा आठवते.
कारण तेच आपले मूळस्वरूप आहे.
त्याला जाणणे हाच मनुष्याचा हेतु असला पाहिजे.
जो परब्रह्माला खऱ्या अर्थाने जाणतो तो
त्याला जाणल्याचा दावा कधीच करत नाही.
कारण ..
येथे जाणपण तेचि नेणपण ।
नेणपण तेचि जाणपण ।
आम्ही जालो ऐसे म्हणे ।
तो काहींच नोहे ।।
खरा ज्ञानी ज्ञानाचा कांगावा कधीच करत नाही.
आपल्याला अजून काहीच समजले नाहीये
असच त्याचे विनम्र वर्तन असते.
याउलट आम्ही झालो. आम्ही पोचलो बरं का !
असे जाहीरपणे बडबडणारा शब्दपंडित
खरे तर शून्य लायकीचा मानावा.
साधनप्रतिष्ठानिरूपण समास.
Comments