श्रवणें सद् बुद्धि लागे । श्रवणें विवेक जागे । श्रवणे मन हे मागे । भगवंतासी ।।
।। दास-वाणी ।।
श्रवणें सद् बुद्धि लागे ।
श्रवणें विवेक जागे ।
श्रवणे मन हे मागे ।
भगवंतासी ।।
श्रवणें कुसंग तुटे ।
श्रवणें.काम वोहटे ।
श्रवणें धोका आटे ।
येकसरा ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०७/०८/१२-१३
अध्यात्मिक श्रवणाने कुबुद्धी नष्ट होऊन
सद् बुद्धी वाढीस लागते.
त्यामुळे अविवेकाचे जाळे झडून
विवेक म्हणजे योग्य अयोग्याची निवड सुलभ होते.
भक्तिपूर्वक श्रवणाने प्रापंचिक विषयांची ओढ
संपून जाते. एकाग्र झालेले मन फक्त
भगवंत दर्शनाचीच तीव्र इच्छा करते.
सुमधूर पवित्र श्रवणामुळे दुष्ट आणि नालायक
लोकांची संगत आपोआपच तुटून जाते.
कीर्तन निरूपण सातत्याने ऐकल्यावर आपोआपच
भक्ताची निर्वासन वृत्ती बळावते.
कामविकार क्षीण होत जातो.
सामाजिक अध:पतनाचा धोकाही टळतो.
नवविधा भक्तीमधील पहिली श्रवणभक्ती
ही साधकाला पारमार्थिक प्रगतीला
मार्गदर्शक ठरते.
श्रवणनिरूपण समास.
Comments