ऐसे सांगतां असे वाड । परी जेथील तेथेंचि गोड । तैसी ज्ञानीयांस चाड । अद्वैत ग्रंथाची ।।
।। दास-वाणी ।।
ऐसे सांगतां असे वाड ।
परी जेथील तेथेंचि गोड ।
तैसी ज्ञानीयांस चाड ।
अद्वैत ग्रंथाची ।।
योगियांपुढे राहाण ।
परीक्षवंतापुढे पाषाण ।
पंडितापुढे डफगाण ।
शोभा न पवे ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०७/०९/१८-१९
कोणापुढे कोणते श्रवण लावावे हे निश्चित असते.
मल्हारी मार्तंड आख्यान द्वारकेमधे, द्वारिकामहात्म्य
वाराणसीमधे तर काशी विश्वेश्वर तिरूपतीला
वाचलेला चालत नाही.
अशा सांगण्यासारख्या गोष्टी खूपच आहेत.
तात्पर्य काय जिथे जी गोष्ट चपखल तिथेच ती
योग्य ठरते. आत्मज्ञानी लोकांसाठी अद्वैत ग्रंथच योग्य.
तिथे पुराणकथा काय कामाची ?
योगी पुरूषांपुढे चेटुकविद्येची प्रात्यक्षिके,
किंवा रत्नपारख्यांसमोर गारगोटीचे दगड
परिक्षेसाठी ठेवले तर काय उपयोग?
ज्ञानी पंडिंतांसमोर कीर्तन प्रवचन निरूपणाऐवजी
रात्रभर डफगाणी आणि भेदिक लावण्या
सुरू ठेवल्या तर ते शोभेल तरी काय ?
अधिकार तैसा दावियेला मार्ग ।
साहे ओझे त्यांसी तेचि देऊ ।।
ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार श्रवण दिल्यास
प्रत्येक भक्ताला ईश्वरप्राप्तीसाठी ते
सहाय्यकच ठरेल.
श्रवणनिरूपण समास.
Comments