बस्ती उपक्रम

*बस्ती उपक्रम*
©डॉ. श्वेता कुलकर्णी
(MD Ayurveda, MA Sanskrit)
*पंचकर्म चिकत्सा*
बरेचदा रूग्ण असे सांगतात की डॉक्टर मला माझे पंचकर्म करून घ्यायचे आहे...ती पाच कर्म कोणती व ती मी एकदमच करायची का?
असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात.
यासाठी इथून पुढील लेख पंचकर्म चिकित्सेची माहिती देण्यासाठी प्रकशित करत आहे.
पंचकर्म चिकित्सा ही मुख्यतः शरीरातील विविध दोष निघून जावे व शरीराची शुद्धी व्हावी यासाठी केली जाते. ही केवळ आयुर्वेद शास्त्रातील वैशिषट्यपूर्ण चिकित्सा पद्धती आहे.
पंचकर्म चिकित्सेत पुढील पाच कर्म आहेत -
1.वमन 
2.विरेचन
3.बस्ती
4. रक्त मोक्षण
5. नस्य
या प्रत्येक कर्माची ओळख आपण पुढील लेखांमध्ये करून घेणार आहोत.
त्याचप्रमाणे या कर्मांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या शिरोधारा, शिरोबस्ती, नेत्र तर्पण यांसारख्या विविध क्रियांविषयी जाणून घेणार आहोत.
ही सगळी कर्म एकदम करता येत नाहीत. ऋतुमानानसार व त्या व्यक्तीच्या प्रकृती नुसार कोणते कर्म करावे हे ठरत असते.
*या लेखात वातावरील श्रेष्ठ उपक्रम बस्ती चिकित्सा याविषयी जाणून घेऊया*
*बस्ती उपक्रम* - आयुर्वेद शास्त्रात शरीर शुद्धीसाठी पंचकर्म चिकित्सा वर्णन केली आहे.बस्ती हा पंचकर्म चिकित्सेतील प्रमुख उपक्रम आहे.
*विशेषतः वाताच्या विकारासाठी बस्ती ही मुख्य चिकित्सा सांगितलेली आहे.*
बस्ती हा विविध औषधी वनस्पती अन औषधी तेलं यांनी युक्त असतो.त्याचे रूग्णांची प्रकृती व व्याधीअनुरूप विविध प्रकार आहेत.
1.मात्राबस्ती - या बस्तीमध्ये विशिष्ट प्रकारची तेलं उदा. सहचर तेल, धान्वंतर तेल यासारखी वातशामक सिद्ध तेलं वापरली जातात. वातप्रकृती च्या रूग्णांमध्ये तसेच बृहणार्थ हा बस्ती दिला जातो.स्त्रियांना होणारे PCOD इत्यादी विकार व वंध्यत्व यावरही याचा उत्तम उपयोग होतो.
2.निरूहबस्ती - यांत विविध औषधींचा काढा वापरला जातो. याचे रास्नाएरंडमूलादी, दशमूलादी इत्यादी अनेक प्रकार आहे.हे बस्ती मुख्यत्वे वातशमन व दूषित अशा वात, पित्त व कफ आदि दोषांचे शरीरातून निर्हरण यासाठी दिले जातात.सांध्यांचे विकार, वातविकार, मणक्याचे विकार, संधिवात, आमवात,पोटाचे विकार, piles, त्वचाविकार अशा विविध आजारांमध्ये दिले जातात.
3.लेखनबस्ती - विविध प्रकारच्या औषधींचा काढा,तेल व लेखन करणारे क्षार वापरून हा बस्ती दिला जातो. मुख्यतः स्थूलपणा व त्यामुळे होणारे इतर व्याधी थायरॉईड, मधुमेह यामध्ये हा बस्ती दिला जातो.मुख्यतः वजन कमी करणे व शरीराला हलकेपणा येण्यासाठी हा बस्ती दिला जातो.
4.तिक्त क्षीर बस्ती - औषधी काढयाचा दूध व तूप युक्त असा हा बस्ती सगळ्या जुनाट वातविकांवर श्रेष्ठ आहे. विशेषतः सांध्यांची झीज होणे, मणक्यांचे विकार
(Degenerative changes, spinal disorders, spondylitis, Osteoarthritis )
यामध्ये हा बस्ती दिला जातो.
5. बृहणार्थ बस्ती - लहान मुलांमध्ये विशेषतः वजन व उंची वर्धनार्थ हे बस्ती दिले जातात.यामुळे मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी दीर्घकालीन फायदा होतो.
याप्रमाणे विविध वातविकार तसेच शरीरशुध्दीसाठी बस्ती हा सर्वश्रेष्ठ उपक्रम आहे.
श्रीविश्व आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय येथे हे विविध
बस्ती उपक्रम अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने केले जातात.
©डॉ. श्वेता कुलकर्णी
श्रीविश्व आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
गोपाळ नगर लेन नं 2
मंजुनाथ शाळेजवळ
डोंबिवली (पूर्व )
Whatsapp no.9404216580
Follow our YouTube channel for more Ayurveda information:
https://youtube.com/@shreevishwaayurvedpanchakarmac

Follow our Facebook page for more Ayurveda posts:
https://www.facebook.com/profile.php?id=100076368301832&mibextid=ZbWKwL

©Dr. Shweta Kulkarni (MD Ayurveda MA Sanskrit)
ShreeVishwa Ayurved and Panchkarm Chikitsalalay, Dombivli.
Contact number - 9404216580

Comments

Doctor

Image Gallery with Captions and Links
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
May all sentient beings be at peace, may no one suffer from illness, May all see what is auspicious, may no one suffer. Om peace, peace, peace.

Total Pageviews