Asparagus in Hindi or Asparagus meaning in Hindi- सतावर, सतावरि, सतमूली, शतावरी, सरनोई Shatavari in English- Wild asparagus (वाईल्ड एस्पैरागस)
शतावरी..
शतावरीला विविध भागात विविध नावाने ओळखले जाते.
Asparagus in Hindi or Asparagus meaning in Hindi- सतावर, सतावरि, सतमूली, शतावरी, सरनोई
Shatavari in English- Wild asparagus (वाईल्ड एस्पैरागस)
Asparagus in Sanskrit-शतावरी, शतपदी, शतमूली, महाशीता, नारायणी, काञ्चनकारिणी, पीवरी, सूक्ष्मपत्रिका, अतिरसा, भीरु, नारायणी, बहुसुता, बह्यत्रा, तालमूली, नेटिव एस्पैरागस (Native asparagus)
Asparagus in Urdu- सतावरा (Satavara)
Asparagus in Oriya- चोत्तारु (Chhotaru), मोहनोले (Mohnole)
Asparagus in Gujarati- एकलकान्ता (Ekalkanta), शतावरी (Shatavari)
Asparagus in Tamil or Asparagus meaning in tamil- किलावरि (Kilavari), पाणियीनाक्कु (Paniyinakku)
Asparagus in Telugu or Asparagus in telugu- छल्लागडडा (Challagadda), एट्टावलुडुटीगे (Ettavaludutige);
Asparagus in Bengali- शतमूली (Shatamuli), सतमूली (Satmuli)
Asparagus in Punjabi- बोजान्दन (Bozandan); बोजीदान (Bozidan)
Asparagus in Marathi- अश्वेल (Asvel), शतावरी (Shatavari)
Asparagus in Malayalam- शतावरि (Shatavari), शतावलि (Shatavali)
Asparagus in Nepali- सतामूलि (Satamuli), कुरीलो (Kurilo)
Asparagus in Arabic- शकाकुल (Shaqaqul)
Asparagus in Persian- शकाकुल (Shaqaqul)
शतावरीची फुले पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाची असून गुच्छात येतात. फळ वाटाण्याच्या आकारमानाचे असून त्यामध्ये एक किंवा दोन मिरीएवढ्या बिया असतात. झाडाची मुळे जाड, लांबट गोल असून दोन्ही टोकाकडे निमुळती असतात. यांनाच कंद असे म्हणतात. कंद पांढरे असतात व ते एका झाडाला १०० पर्यंत असू शकतात. यामुळेच या वनस्पतीला शतावरी असे नांव पडले आहे. शतावरीची मुळे जमिनीखाली बुंध्याजवळ झुपक्याने वाढतात. एका वेलीस अनेक मुळ्या फुटतात साधारणतः १०० मुळ्या एकावेळी फुटल्यामुळे तिला शतमुळा असे नाव पडले आहे. मुळांच्या वर पातळ करडय़ा रंगाचा पापुद्रा असतो, तसेच मुळाचा मधला भाग पिवळसर रंगाचा आणि टणक असतो. मुळांचा औषधात वापर करताना हा भाग काढून टाकावा लागतो. शतावरी मधुर रसाची असते .
शतावरीच्या मुळ्या आणि अंकुर या भागांपासून औषधी रसायने मिळवतात. शतावरीची चव गोड आणि कडू असते.ती कफ आणि पित्त कमी करते.शतावरीपासून शतावरी घृत, विष्णू तेल, शतावरी कल्प तसेच प्रमेह मिशतेल तयार केले जातात. शतावरी स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते.शतावरीचे नारायण तेल हे अर्धांगवायू व संधिवातासाठी उपयुक्त आहे. शतावरीच्या कंदामध्ये सॅपोनिन, ग्लायकोसाइड्स, फॉस्फरस, रिबोफ्लेव्हिन, थायमाईन, पोटॅशियम, कॅल्शियम व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत. कंदाचा उपयोग पित्तप्रदर, ज्वर, धातुवृद्धी, मुतखडा, अपस्मार व रक्तशुद्धीसाठी केला जातो. कंदाचा उपयोग जनावरांमध्ये विशेषतः गायी, म्हशींमध्ये जास्त दूध मिळण्यासाठी केला जातो. शतावरी कल्प हा शतावरीच्या कंदापासून बनविला जातो. तसचे शतावरीपासून तयार केलेले नारायण तेल अर्धांगवायू व संधिवातावर गुणकारी आहे. तसेच ही स्मृतिवर्धक कार्य करते. मासिक पाळीत अंगावरून खूप स्राव जाणे ही, नव्याने पाळी येणाऱ्या तरुण मुली व पाळी जाण्याच्या मेनोपॉझच्या काळात या तीनही तक्रारींमध्ये स्त्रियांना शतावरी वनस्पतीची मदत होते. स्त्रियांच्या सुलभ प्रसूतीसाठी हिचा वापर केला जातो.
शतावरीला महिलांच्या आरोग्यासाठी आणि स्त्रियांची कामवृत्ती स्थिर ठेवण्यासाठी “औषधी वनस्पतींची राणी” म्हणून ओळखलं जातं. हे स्त्रियांसाठीचं टॉनिक आणि संप्रेरक/हार्मोन्स संतुलन करणारं औषध किंवा जडीबुटी म्हणून सुमारे 2500 वर्षांपासून वापरले जात आहे. आयुर्वेदाच्या प्राचीन भारतीय उपचार प्रणालीमध्ये एक शतावरीला प्रमुख स्थान आहे.
शतावरी एक वनस्पती आहे, त्याची लांबी 80-100 सेमी आहे. आणि त्याची मुळं पसरत जाणारी आहेत. ती शंभर हून अधिक असतात म्हणून ह्या वनस्पतीला शतावरी म्हणतात. जी मुळं 100 सेमी लांबीची आहेत आणि ह्यावरचा मातकट रंगाचा भाग काढून टाकल्यावर ही मुळे दुधासारखी शुभ्र दिसतात. शतावरी अनेक रोगांवर वापरली जाते.
शतावरी दोन् प्रकारची असते---
विरलकन्द शतावर (Asparagus filicinus -Ham ex D.Don)
याचे कन्द छोटे, मांसल, फुललेले तसेच झूपक्याने असतात. यांचा काढा करून पितात.
कुन्तपत्रा शतावर (Asparagus gonoclados Baker)
हा एक झुडूप असतो.याचे कन्द छोटे आणी मोठे असतात.फुले पांढऱ्या रंगाची असतात, आणी फळे गोल असतात. फळे कच्ची असताना हिरवी आणी पिकल्यावर लाल होतात.याचे कंद शतावरी पेक्षा लहान असतात.
Reference
कार्तिक हजारे
गडचिरोली.....!
9765367058
Comments