Madhurani shares दिव्यत्वाची प्रचिती जय गुरुदेव..पूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर ह्याच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करण्याचा एक अतिशय दैवी योग माझ्या आयुष्यात आला...
Madhurani shares
दिव्यत्वाची प्रचिती
जय गुरुदेव..
पूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर ह्याच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करण्याचा एक अतिशय दैवी योग माझ्या आयुष्यात आला... त्यांच्या समोर गुरुवंदना गायले. त्यांचे आशीर्वाद लाभले ...माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
माझ्यासाठी गेलं वर्षं खूप काही शिकवून जाणारं होतं. टोकाचे मानसिक चढउतार अनुभवले. त्याचे तब्येतीवर होणारे परिणाम भोगले. ह्या प्रवासात माझ्या हे अगदी लक्षात येत होतं की मला स्वतः वर काम करायला हवंय. मनाची स्थिरता मिळवायला हवीय. मनाची ताकद वाढवायला हवीय. मला मार्ग सापडत नव्हता.
आणि एक दिवस अचानक तो सापडला. पूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर ह्याची सुदर्शन क्रिया.
मी खूप पूर्वी शिकले होतेच... पुन्हा एकदा शिकले आणि नियमित करू लागले . मग सहज समाधी ध्यान, मग Advance मेडिटेशन कोर्स.... ह्या सगळ्यामुळे मला काय आणि किती लाभ झालेत हे मला शब्दांत सांगता येणं कठीण आहे.
जसजसा मी सराव करत होते, गुरुजींची अनेक lectures ऐकत होते , तशी त्यांना प्रत्यक्षात भेटायची इच्छा प्रबळ होत होती. बराच काळ ते भारताबाहेर असतात, भारतात असले तर प्रचंड बिझी असतात .... कधी आणि कसे भेटणार ??? मनाततली इच्छा मनातच राहणार असे वाटत होते.
आणि अचानक म्हणजे out of the blue म्हणतात तसा महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने श्री किरण जोशी ह्यांचा फोन आला आणि ते म्हणाले आम्ही असा असा कार्यक्रम करतोय त्यात विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्याना पुरस्कार देतोय, त्यात तुम्हाला घ्यायचाय आणि तो ही गुरुजींच्या हस्ते.
माझा विश्वास बसेना , मी पुन्हा एकदा सगळं विचारलं....
माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. पण त्या दिवशी शूट असणार होतं , कसं होणार. पण म्हणतात न गुरू नी बोलावलं म्हंटल्यावर सगळं आपोआप घडत जातं
मी सेटवर माझ्या मनातली ही इच्छा आमच्या दिग्दर्शकाना सांगितली , त्यांनीपण cooperate केलं , सगळं adjust करून मला ह्या सत्काराला जाता येईल असं बघितलं।
मी इतकीच इच्छा व्यक्त केली होती की प्रत्यक्ष आशीर्वाद घेता यावेत.... पण लाभलं ते किती अद्भुत ...!! .... जय गुरुदेवi
Comments