बस्ती उपक्रम डॉ. श्वेता कुलकर्णी MD आयुर्वेद
◆◆बस्ती उपक्रम◆◆
डॉ. श्वेता कुलकर्णी
MD आयुर्वेद
बस्ती उपक्रम - आयुर्वेद शास्त्रात शरीर शुद्धीसाठी पंचकर्म चिकित्सा वर्णन केली आहे.बस्ती हा पंचकर्म चिकित्सेतील प्रमुख उपक्रम आहे.
विशेषतः वाताच्या विकारासाठी बस्ती ही मुख्य चिकित्सा सांगितलेली आहे.
बस्ती हा विविध औषधी वनस्पती अन औषधी तेलं यांनी युक्त असतो.त्याचे रूग्णांची प्रकृती व व्याधीअनुरूप विविध प्रकार आहेत.
1.मात्राबस्ती - या बस्तीमध्ये विशिष्ट प्रकारची तेलं उदा. सहचर तेल, धान्वंतर तेल यासारखी वातशामक सिद्ध तेलं वापरली जातात. वातप्रकृती च्या रूग्णांमध्ये तसेच बृहणार्थ हा बस्ती दिला जातो.स्त्रियांना होणारे PCOD इत्यादी विकार व वंध्यत्व यावरही याचा उत्तम उपयोग होतो.
2.निरूहबस्ती - यांत विविध औषधींचा काढा वापरला जातो. याचे रास्नाएरंडमूलादी, दशमूलादी इत्यादी अनेक प्रकार आहे.हे बस्ती मुख्यत्वे वातशमन व दूषित अशा वात, पित्त व कफ आदि दोषांचे शरीरातून निर्हरण यासाठी दिले जातात.सांध्यांचे विकार, वातविकार, पोटाचे विकार, piles, त्वचाविकार अशा विविध आजारांमध्ये दिले जातात.
3.लेखनबस्ती - विविध प्रकारच्या औषधींचा काढा,तेल व लेखन करणारे क्षार वापरून हा बस्ती दिला जातो. मुख्यतः स्थूलपणा व त्यामुळे होणारे इतर व्याधी थायरॉईड, मधुमेह यामध्ये हा बस्ती दिला जातो.मुख्यतः वजन कमी करणे व शरीराला हलकेपणा येण्यासाठी हा बस्ती दिला जातो.
4.तिक्त क्षीर बस्ती - औषधी काढयाचा दूध व तूप युक्त असा हा बस्ती सगळ्या जुनाट वातविकांवर श्रेष्ठ आहे. विशेषतः सांध्यांची झीज होणे, मणक्यांचे विकार
(Degenerative changes, spinal disorders )
यामध्ये हा बस्ती दिला जातो.
5. बृहणार्थ बस्ती - लहान मुलांमध्ये विशेषतः वजन व उंची वर्धनार्थ हे बस्ती दिले जातात.यामुळे मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी दीर्घकालीन फायदा होतो.
याप्रमाणे विविध वातविकार तसेच शरीरशुध्दीसाठी बस्ती हा सर्वश्रेष्ठ उपक्रम आहे.
Comments