कढिपत्ता आहारात वापरा जास्त / कॕन्सर प्रतिबंध हा उपाय मस्त

कढिपत्ता आहारात वापरा जास्त /
कॕन्सर प्रतिबंध हा उपाय मस्त//  

(घर बांधकाम कमी असाव .
पण बगीचा भरपूर असावा.त्यात तुमच्या आवडीचे फुल झाड असू द्या. पण थोडी जागा औषधी वनस्पती ला ठेवाच.अगदी सहज तुम्ही या लावू शकता स्वतः व दुसर्यांच्या आरोग्याची काळजी घेउ शकता.
  गुळवेल ,कढिपत्ता गोकर्ण ,केळी ,देशी गुलाब ,
तुती ,बहावा ,अडुळसा, तुळस, जांभुळ ,पेरु ,नारळ, शतावरी,मुसळी ,अश्वगंधा,
सर्पगंधा, कोरफड ,ब्राम्ही, वेखंड अश्या कीतीतरी वनस्पती बगीच्यात लावू शकता.
या सर्व आपण स्वतः वापरुन दुसर्यांनाही माहिती देउन भेट देउन आपली भारतीय संपदा अबाधित ठेउ शकतो.
अगदि आजीबाईंचा बटवा वापरुन व घरगुती वनस्पती वापरुन आपण आपली व समाजाची सेवा करावी.
आपल्या बगीच्यातील काही वनस्पती आयुर्वेदीय दुकान ,वैद्द व आयुर्वेदीय औषधी कारखान्या दान करु शकता. दिवाळीला फराळ लाडु देण्यापेक्षा शतावरी गुडुची वडी खावू घालण्याची मजाच वेगळी.
घरी आलेल्या पाहूण्यास गोकर्ण वाळलेल्या फुलाचा चहा अप्रतिमच.
अगदि शेवगा पाला पावडर 
गोकर्ण फुल, गुळवेल अश्या कीतीतरी वनस्पती दान देउ शकता.
माझ्या कडील 20 झाडांचे जवळपास 400 नारळ मी मागील दिवाळीस काढुन सर्वांना फराळ म्हणून दिले.
चला आज अशीच सहज बुके म्हणून देउ शकणारी कींवा पावडर करुन भेट देण्यासाठी
कढिपत्ता माहिती बघूया. 

भारतीय मसाले ,आहार, विहार, योग ,याग हे सर्व संपूर्ण आरोग्याची काळजी घेत असत .
भारतीय मसाले तर कॕन्सररोधक तत्व असलेली आहेत.
परदेश्यापेक्षा भारतात कॕन्सरप्रमाण कमी होत .
पण जस प्रेस्टीसाईड्स व केमीकल फवारण्या आल्या तस कॕन्सर व मधुमेह प्रमाण झपाट्याने वाढल.
हे सत्य नाकारुन चालनार नाही.
अजुनही वेळ गेली नाही शक्यतो सेंद्रिय भारतीय मसाले व वनस्पती आहारात वापरुन आपण निरोगी राहु शकतो.
भारतीय मसाले हे आयुर्वेद शास्त्रावर अवलंबून आहे.
शाकाहारी असो वा मांसाहारी त्यात मसाला वनस्पती असल्यातरच चव लागते .
जेवढे चवदार तेवढे आंनददायी जेवण.
आणि आज आपण हे सोडुन प्रेस्टीसाईड रंग चायनीज च्या मागे लागलो अन आजार ओढाउन घेतो .
भारतीय मसाला पद्धत आजार होउ नये म्हणून व पाचन नीट व्हावे ज्यायोगे मधुमेह , कॕन्सर सारखे आजार होणार नाही.
हे मसाले उपयोग लिहत बसलो तर लिखान वाढेल पण सामान्यपणे आपण जे वनस्पती मसाला वापरतो त्यात आजार होउ नये याची व्यवस्था नक्कीच पुर्वजांनी केलेली होती.
ऐकत्र कुंटुब पद्धतीने सर्व स्त्रीया ऐकत्र ऐउन खलून, कुटुन सर्व मसाला तयार करत .
आता विभक्तकुटुंबा मधे मसाला वीकत आणतो .
हळदित रंग, तिखटात रंग, मसाल्यात ईतरच पदार्थ व त्यात खंमग सेंट .
बर जात्यावरचे सात धान्ये गेली विकतचाआटा आला.
फवारणीच्या भाज्या.
स्वंयपाक घरात वापरण्यात येणारे मसाले जरा महाग पडतील पण यापासुन हानी काहीच होत नसुन लाभच होणार आहे ना?
मसाल्यांचा ऊपयोग प्राचीन काळापासुन होत आला आहे.
मसाले आपल्या जेवनास चवीष्ट 
बनवतात.
हे भुक वाढवुन पोषकता आणतात.
लाळ वाढवुन पाचन शक्ती मजबुत करतात.
यातील वनस्पती औषधी सत्व आजार होउ देत नाही.
काही मसाले कृमी व कीटाणु नाश करतात.काही मसाले रक्तवहन चांगले करते.
उदाहरणार्थ दालचीनी रक्तपातळ ठेउन वाईट कोलेस्ट्रोलाल वाढु देत नाही.
हळद कॕन्सरनाशक आहे,
काही मसाले छाती रोग होउ देत नाही उदाहरणार्थ लवंग व अद्रक .
काही मसाले मासपेशी स्वस्थ व रक्त पातळ ठेवतात उदाहरणार्थ लसुन.
मन्नुका ,आवळा, काजु ,बदाम ,नारळ असे कीती उपयोगी मसाले आहेत की आरोग्य अबाधीत ठेवतात.
काही मसाल्यांचा थोडक्यात उपयोग बघु.
मीरची-वातनाशक ,अग्नीदिपन. 

शहाजीरे-नाडी प्रबल ,गर्भाशय रक्षक . 

काळीमीरि-ज्वरनाशक, कफनाशक. 

अजवायन /ओवा-उदररोग नाशक . 

मीठ(सींधेलोन कींवा पादेलोन उत्तम)-शरीरास बलदायी. 

दालचीनी-नाडीसंस्थान उत्तम चालवते. 

जायपत्री -कमी वापरावी-अग्निवर्धक, वमन ,कास, क्षय नाशक . 

आंम्बा आमसुल-मलभेदक
मेथी-पीत्तशामी ,मधुमेहनाशी, वायुनाशक . 

लवंग-ऊष्ण ,स्वास ,कास, नाशक. 

खसखस-मादक; मुत्रल, व वाजीकारक. 

हीरडा बाळहीरडा-पोटाचे सर्व वीकार प्लीहाशोथहर ,पीत्तहर व वीरेचक. 

हळद-कॕन्सर वीरोधी रक्तशुद्धी मासपेशी सुज कमी करते. 

जीरे-पाचक . 

हींग -सारक दिपन व पीत्तवर्धक. 

लघुवेल(लहान वीलायची)-लाळ वाढवते.मुख दुर्गंधी घालवते .लाळ उत्पन्न करते. 

मोहरी-मेदहर, वातनाशक. 

चींच-रक्तवाहक ,दिपन, चवीष्ट. 

पिंपळि-स्वास कासावर उपयोगी. 

धणे-उष्णता कमी करणे.गॕस अपचन नाशक. 

बडीशेप शौप -उदराग्नी प्रदिपक, मुखदुर्गःध नाशी, मुत्रल. 

लसुन -उष्ण, विषनाशक, रक्तप्रवाहक. 

सुंठ-मलभेदक आमपाचक स्वास कास नाशक. 

मोठी वीलायची-पीत्त कमी करणारी रक्तवीकार कमी करणारी. 

कांदा -बलकारक विर्यवर्धक. 

कडीपत्ता- केशवर्धक व पचन कॕन्सररोधक. 

पुदिना-वातनाशक,उदरशुल नाशक. 

नागकेशर -रक्तदाब नीयंत्रक. 

चुकन्दर-लिव्हर साठी ऊत्तम.

याशिवाय बदाम ,काजु, बादलफुल, कीसमीस ,खोबरे दगडफुल ,जायफळ ,चारोळी केशर ,ओवा पान ,अक्रोड, कोकम पावडर ,डाळींब पावडर, जवस ,तीळ ,सीमला मीरची ,खजुर ,चक्रफुल ,डींक जेष्ठमध ,कमळ बी, तेजपत्री तमलपत्र ई. ज्या त्या प्रदेश व राज्यात मसाले बनतात .हे आरोग्यदायी असुन नियमीत वापरात असावे. 

कोणत्याही केमोथेरपी चालु असलेल्या रुग्णास कढिपत्ता पावडर ऐक चमचा द्यावीच असा मी आग्रह धरतो. 

कढीपत्ता रस, कडुनींब रस करंजपान रस ,झेंडुपान रस गोमुत्रात उकळुन ते गोमुत्र मुलतानी मातीत मिक्स करुन वडी करावी सुंदर फेसपॕक तयार होतो.जो त्वचा मुलायम व निरोगी ठेवतो.

भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध म्हणजे कढिपत्ता. 

‘कढीपत्ता’ हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून,ते एक सुंदर आणि साधे औषधआहे.
पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले. की, त्यांच्या अज्ञानाची भयंकर किव येते. 

कढीपत्त्याचे झाड बऱ्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते.जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो.त्याला बऱ्याचदा बिया लागलेल्या सापडतात. या बिया गोळा करून अंगणात लावल्या की फार चांगल्या पद्धतीने रुजतात…आणि झाड मोठे झाले की त्याच्या बिया आजूबाजूला पडून, कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात. 

कढीपत्त्याचे ‘आहार’ आणि ‘औषध’ अशा अनुषंगाने उपयोग पाहूया.
१) आपण आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी कढीपत्ता वापरतो.
प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते.
त्यामुळे जेवण रुचकर लागते. 

२) जुलाब लागले असता, कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला की,
‘पोटातल्या वेदना’ आणि ‘जुलाबाचे वेग’ वेगाने नियंत्रणात येतात. 

३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो. ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो, त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत. 

४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे. नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत. 

५) मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत.
याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते. 

७) कोलेस्टेरॉल वाढले असेल तर, कढीपत्त्याची वीस पाने अनशापोटी चावून खावीत. 

८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत. केस पांढरे होत नाहीत.
शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते. 

९) कर्करोगाने पिडीत रुग्ण ‘केमो’ आणि ‘रेडियो’ थेरपी घेत असताना, त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते. अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखरेसोबत चावून खायला लावावीत. रुग्णाला बराच आराम मिळतो. 

१०) सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील तर, अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत. 

११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे ‘अमृत’ आहे. कोणत्याही प्रकारच्या काविळीत
कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे. 

१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर, कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो. 

१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर, मिरी, आले आणि सैंधव मिसळून
कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावीत. याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही. 

१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर, डोळ्यांचे विकार कमी होतात.
[संदर्भ माहीती - मराठी खजिना] 

1)कढीपत्ता तेल केसांसाठी उपयुक्त आहे
२ ) कढीपत्त्यात अँटी - ऑक्सिडेंट , अँटी बॅक्टेरीयल , अँटी - फंगल गुण आहेत . त्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्स येण्यापासून बचाव होतो .
३ ) कढीपत्त्यामुळे पदार्थांना चव येते . कढीपत्त्यामुळे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढते .
४ ) कढीपत्ता आयरन आणि फॉलिक अॅसिडचा स्रोत आहे . आयरनची कमतरता फक्त शरीरात आयरन नसल्यानं नाही तर शरीरामध्ये आयरन मुरत नसल्यामुळे होते . याव्यतिरीक्त फॉलिक अॅसिड आयरन शोषून घेण्यास मदत करते . 
५ ) कढीपत्त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते . ब्लडमधील इन्सुलिनला प्रभावित करुन ब्लड - शुगर लेवल कमी करते .
६ ) कढीपत्त्यामुळे पचनशक्ती वाढते आणि वेट लॉससाठी मदत होते . यासाठी जास्त वजन असलेल्या लोकांनी कढीपत्त्याचं सेवन नियमित करावं . रोज उपाशीपोटी कढीपत्ता खाल्लात तरी चालेल . 
७ ) कढीपत्त्याच्या सेवनानं कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते . रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाला वाढवून हृदयासंबंधी रोग आणि एनथेरोक्लेरोसीसचे रक्षण करते . 
८ ) तुम्हाला कफाचा त्रास असेल तर कढीपत्त्याच्या पावडरमध्ये एक चमचा मध मिसळून त्याचं चाटण तयार करा . रोज हे चाटण खाल्लं तर कफाच्या त्रासातून मुक्ती होईल . 

‘बहुगुणी’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ कढीपत्ता आहारात नियमित ठेवा. कच्चा चावून खा.
आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.
भारतीय पक्वान्नांमध्ये कढी पत्त्याचा वापर फक्त फोडणी लावण्यासाठी केला जाता. याला 'गोड लिंबं'देखील म्हटले जाते. यात बर्‍याच प्रकारचे औषधीय गुण असतात. कढीपत्ते केसांना काळं करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात. केसांसाठी कढीपत्त्याचे आणखी फायदे आहेत. ते पाहून घेऊया...   

केसांचे गळणे कमी करणे : कढी पत्त्यांमध्ये व्हिटॅमिन बी1 बी3 बी9 आणि सी असतं. त्याशिवाय यात आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फोरस असतं. याचे सेवन रोज केल्याने तुमचे केस काळे लांब आणि दाट होऊ लागतात. एवढंच नव्हेतर हे केसांमध्ये असणार्‍या डैंड्रफ (कोंडा)पासून देखील बचाव करतो.     

1. कढी पत्त्याचे तेल :  
कढी पत्त्याचा एक गुच्छा घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे आणि सूर्य प्रकाशात त्या पानांना वाळवून घ्यावे, जेव्हा हे पानं वाळून तयार होतील मग याची पूड करून घ्यावी. आता 200 एम एल नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये किमान 4 ते 5 चमचे कढी पानांची पूड मिक्स करून उकळत ठेवावे. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करून द्यावा. तेलाला गाळून एखाद्या एअर टाइट बाटलीत भरून ठेवा. झोपण्याअगोदर रोज रात्री हे तेल लावायला पाहिजे. जर हे तेल थोडे गरम करून लावले तर त्याचे परिणाम लवकरच दिसून येईल. दुसर्‍या दिवशी सकाळी डोक्याला फक्त नॅचरल शँपू लावून धुवावे. या ट्रीटमेंटला तुम्ही रोज किंवा एक दिवसाआड करू शकता. तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.   

2. केसांसाठी तयार करावा मास्क :  

कढीपत्त्याची व कडुनींबपानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनिट तसेच ठेवा, नंतर शॅम्पूनं केस धुवा. असं नेहमी केल्यानं केस काळे आणि घनदाट होतात.    

3. कढीपत्त्याचा चहा तयार करा 

कढी पत्ता पाण्यात उकळून घ्या नंतर त्यात लिंबू पिळा आणि साखर घाला. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवेल. तसेच केस पांढरे होण्यापासून वाचवेल आणि आपली डायडेस्टिव सिस्टमही स्वस्थ ठेवेल. 

कढीपत्ता’ म्हणजे परसबागेतील दुर्लक्षित रोपटेच म्हणा ना! पण त्याचे अस्तित्व घरोघरी आहेच हं! जसे आल्याबरोबर लसूण, तसे कोथिंबीरी बरोबर कढीपत्ता असे जणू समीकरणच झाले आहे. २०-२५ वर्षापूर्वी काढीत टाकण्यापुरता तो कढीपत्ता. म्हणजे स्वादिष्ट कढी होते एवढ्या पुरता महाराष्ट्राला ढोबळमनाने कढीपत्ता माहिती होता. पण आज कांदेपोहे असो, उपीट असो अथवा कुठलीही सांबर किंवा महाराष्ट्रीय आमटी कढीपत्त्याशिवाय अपूर्णच. एवढे स्वादाचे काम कढीपत्ता करतो. दक्षिणात्य प्रत्येक पदार्थात व चटण्या यांमध्ये कढीपत्ता असतोच. स्वादाबरोबरच कढीपत्ता भूक उदिप्त करतो. असे त्याचे महत्त्व आहे.
कढीपत्त्याने कर्करोगास प्रतिबंध होतो. 
मधुमेहाचे प्रमाण कमी होते. कोलेस्टोरॉलचे प्रमाण कमी होते. याचा पाला पोटात गेल्यावर फायबर असल्याने व कॅन्सर विरोधक तत्व यात असल्याने कॅन्सरला प्रतिबंध होतो. 
संग्रहित माहिती.
टिप-
माहीती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
लेखकाने आयुर्वेद ग्रंथ व अभ्यासातील औषधे पुस्तकांचा समावेश लेखात केला आहे. काही औषधीत वाळलेले काष्ट, पंचांग उपयोगात येतात त्यामुळे औषध वनस्पती झाडांचा फोटो टाकतांना गुगल सर्च चा उपयोग केला तर वनस्पती फोटो चुकु शकतात कृपया चुक झाल्यास कळवावे.
डाॕ.लीलाधर उगले 
पन्नासवर्ष अविरत होमीओपॕथी सेवा.
डाॕ.कैलास उगले
पंचवीस वर्षे आयुर्वेद हर्बल संशोधनात्मक उत्पादन व अॕक्युंपंक्चर 

Comments

Doctor

Image Gallery with Captions and Links
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
May all sentient beings be at peace, may no one suffer from illness, May all see what is auspicious, may no one suffer. Om peace, peace, peace.

Total Pageviews