कोरपड

कोरपड


सर्वांकडे असणारी एक अतिशय उपयुक्त वनस्पती कोरफड जवळपास सर्वांच्याच दारात कोरफड असते कोरफड ही सहज उगते त्यासाठी कोणतेही जास्त काळजी घेण्याची गरज नसते कोरफडीचे खूपच उपयोगी गुणधर्म आहे त्यापैकी काही इथे देत आहे

🌵कोरफडीच्या पाच मिलिलीटर रसात अर्धा चमचा मध घालून रोज सकाळी नाशत्यापूर्वी घ्यावा. त्यामुळे भूक लागते. शौचास साफ होते.
🌵 कोरफडीच्या रसात सैंधव मीठ (एक चमचाा रस + चिमूटभर मीठ) घालून सकाळ-रात्री दिल्सास कफ, खोकला, डांग्या खोकला थांबतो. 
🌵दम्याने मुलांचे पोट उडते. त्यावर कोरफडीच्या रसात तूप व मध घालून वारंवार चाटवावे. दम कमी होतो. पोट उडणे थांबते.
🌵 रोज बारीक ताप, भूक न लागणे, वजन कमी होत जाणे, थकवा वाढत जाणे यावर मध आणि पिंपळी चूर्णातून कोरफड रसाचा खूपच चांगला उपयोगा होतो.
🌵 यकृत-प्लीहा वाढणे (लिव्हर व स्पलीन) तसेच जलोदर यांसारख्या जुनाट व भयंकर व्याधीतही कोरफड अत्यंत उपयोगी आहे.
🌵 नाकातून वारंवार रक्त येणे, अनेक प्रकारचे त्वचाविकार, पित्त उठणे, रक्ताच्या गाठी, खाज -खरूज- फोड यासाठी मंजिष्ठ, हळद आणि कोरफडीचा उपयोग होतो.
🌵 डोळे येणे, मूळव्याधीची आग किंवा ठणका, मार लागून रक्त साखळणे, भाजलेल्या जागेची आग होणे अशा विकारांत कोरफडीचा गर बाहेरून लावल्यानेही खूप उपयोग होतो.

🌵कोरफडीचा रस प्यायल्याने नैसर्गिकरित्या वजन घटण्यास मदत होते. कोरफडीच्या रसामुळे मेटॅबॉलिक रेट वाढून वजन घटते. या रसातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरात पसरलेले फ्री-रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.

🌵कोरफडीचा रस शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतो. कोरफडीमध्ये अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायटोन्यूट्रिन्स हे शुद्धतेचे प्रभावी घटक असतात. आयुर्वेदिक डॉक्टर रक्तातील आणि पचनक्रियेतील विषारी घटक काढून टाकण्यासाठी कोरफडीचा रस पिण्याचा सल्ला देतात.
🌵पचनक्षमता वाढवते–
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी कोरफडीचा रस रेचक म्हणून कार्य करतो. कोरफडीच्या रसामुळे आतड्यामधील उपयोगी बॅक्टेरियाची वाढ होते, त्यामुळे आतड्यांची अन्नपचन करण्याची क्षमता वाढून अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते. कोरफडीचा रस प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यासही मदत होते.

🌵योनीसंक्रमणास प्रतिबंध करते –
योनीजवळ संक्रमण झाल्यास कोरफडीच्या रसाने त्यावर उपचार करता येतो. कोरफडीमध्ये अँटि-फंगल गुणधर्म असतो. त्यामुळे योनीमार्गाजवळ झालेल्या इंन्फेक्शनमुळे होणारी जळजळ, खाज व दाह कमी होण्यास मदत होते.

🌵दातांचे आरोग्य सुधारते –

नियमितपणे कोरफडीचा रस प्यायल्याने दातांचे आरोग्य सुधारते, हे अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे. कोरफडीच्या रसामुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होते, तसेच प्लाकची निर्मिती रोखण्यास मदत होते. तोंड आलेले असल्यास कोरफडीचा रस तोंडाला लावावा.

🌵रोगप्रतिकारक शक्ती वाढते –

कोरफडीच्या रसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या रसामध्ये व्हिटॅमिन सी’ आणि के’, अमिनो अॅसिड आणि फायटोन्यूट्रिन्स यांसारखे पोषक घटक असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे इंन्फेक्शनपासूनही बचाव होतो.

🌵🥤कोरफडीचा रस कसा बनवाल ?🥤

कोरफडीची पात काढून ती स्वच्छ धुवून घ्यावी. पातीचा वरचा हिरवा भाग काढून आतला जेलीसारखा दिसणारा पारदर्शक गर मिक्सरमध्ये घालून त्याचा रस काढावा.
रस पिण्याअगोदर गाळून घेतला तरी चालेल. कोरफडीचा कडूपणा कमी करण्यासाठी त्यात थोडे मध मिसळावे.
कोरफडीचा रस काढणे अवघड वाटत असेल तर तुम्ही तो मेडिकल किंवा किराणा दुकानातूनही घेऊ शकता. परंतु कोरफडीचा रस विकत घेण्यापुर्वी तो ऑरगॅनिक असल्याची खात्री करून घ्या. कारण तो आरोग्यदायी असतो.
🍷कोरफडीचा रस किती प्यावा ?🍷

सर्वसाधारणपणे दररोज 3-4 टेबलस्पून कोरफडीचा रस पिणे आरोग्यदायी असते. परंतु कोरफडीचा कडू रस पिणे अवघड वाटत असेल तर फ्रूट ज्यूसमध्ये किंवा स्मूथीमध्ये मिसळून पिऊ शकता.

🛑सूचना 
कोरफडीचा रस आरोग्यदायी असला तरी वैद्यकीय सल्याशिवाय पिऊ नये. कारण त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.🛑

मी कोरफड चा साबण, कोरफड चे तेल कोरफड पासून फेस वॉश, कोरपड जेल बनवले आहेत घरीच तसेच झाडांसाठी कीटकनाशके बनवायला पण कोरपड वापरतात
जळलेल्या भागावर कोरफड लावल्यास दाह कमी होतो

कोरफड केसांसाठी तसेच त्वचेसाठी सुद्धा खूपच उपयुक्त अशी आहे .
माहिती संकलन©®शितल गरुड

Comments

Doctor

Image Gallery with Captions and Links
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
May all sentient beings be at peace, may no one suffer from illness, May all see what is auspicious, may no one suffer. Om peace, peace, peace.

Total Pageviews