PCOS Polycystic ovarian syndrome म्हणजे काय?


PCOS Polycystic ovarian syndrome म्हणजे काय? 


सामान्यतः स्त्रीयांच्या बीजकोषात (ओव्हरी) दर महिन्याला एका ग्रंथीची निर्मिती होते. ही ग्रंथी महिन्याच्या मध्यावर फुटून त्यामधून बीजांड (ओव्हम) बाहेर येते. PCOS मध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ही ग्रंथी फुटतच नाही, यामुळे बीजांड बाहेर येत नाही. तसंच अंडाशयात (ओव्हरी) अशा अनेक ग्रंथींची निर्मिती होतच राहते. म्हणून याला पोलि (अनेक) सिस्टिक (ग्रंथी) ओव्हरी सिंड्रोम असे म्हणतात          
                                    लक्षणं : - अनियमित पाळी, पाळीच्या वेळी अनियमित रक्तस्त्राव 
- वजन वाढणं, विशेष करुन ओटी पोटाभोवती जाडी अधिक वाढणे
-चेहऱ्यावर, ओठांच्या वर हनुवटीवर केस उगवणे
- हातापायावर नेहमीपेक्षा अधिक केस उगवणे
- चेहऱ्यावर पिम्पल्स येणे
- सतत मूड बदलणे, चिडचिड होणे, सारखे रडू येणे
- बद्धकोष्ठता
-मानेची, काखेची, मांडयांची त्वचा काळी पडणे
- केस गळणे
- डिप्रेशन येणे
- गर्भ न राहणे
- इन्सुलिनच्या कार्यात अडथळा येणे, रक्तातील साखर वाढणे, इत्यादी.
           आर्युवेद प्रमाणे PCOS हा कफ आणि वात या दोषांचा व्याधी आहे. एका जागी बसून काम करणं, आहारात दूध किंवा दूधाच्या पदार्थाचे अति प्रमाणात सेवन करणे ( उदा. पनीर, बटर, चीज), शीतपेये, मैदा आणि मैदयाचे पदार्थ (ब्रेड, बिस्किट), अजिबात व्यायाम न करणे या सर्व कारणांमुळे शरीरात कफ दोष फाजील प्रमाणात वाढतो. यामुळे जठराग्नी (digestive fire) मंदावते आणि खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन न होऊन आम विषाची (विषारी द्रव्य) निर्मिती होते. वाढलेला कफ आणि आम विष स्त्रीयांच्या बिजांडामध्ये शिरून तिथे अनेक ग्रंथींची उत्पत्ती करतात (Poly cystic ovary). शरीरातील प्रत्येक हालचाल हे वात दोषाचे कार्य आहे, प्रत्येक महिन्याला अंडाशयात ग्रंथीची वाढ होऊन ती योग्य वेळी फुटणे आणि त्यातून बीजांड बाहेर येणे हे शरीरातील अपान वायुचे कार्य आहे. परंतु वाढलेला कफ दोष वाताच्या या कार्यात अडथळे निर्माण करतो आणि PCOS या व्याधीची उत्पत्ती होते.       

      चिकित्सा : सर्व प्रथम व्याधीचे जे हेतू (कारणे) पूर्ण बंद करावेत. PCOS मध्ये वात दोष हा कफामुळे पूर्णपणे आवृत्त झालेला असतो, हे आवरण काढण्यासाठी आधी पंचकर्म केले जाते.
 पंचकर्मातील वमन आणि योग बस्ती हे प्रकार या व्याधीत खूप चांगले परिणाम दाखवतात. कफ दोष कमी करणारी, जठराग्नी उद्दीपित करणारी आणि वाताचे कार्य सुरळीत करणारी अशी औषधांची योजना केली जाते. उदाहरणार्थ त्रिकटू (सूंठ, मिरी, पिंपळी), हिंग, कुमारी (कोरफड), इत्यादी आरोग्य वर्धिनि, हिंग्वाष्टक चूर्ण, चंद्रप्रभा रस, दशमूल, शतावरी, अश्वगंधा ही औषधे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेतली तर आणि तरच PCOS शी सहज दोन हात करता येऊ शकतात.     
   औषधांबरोबरच आहार आणि विहार यांवरही लक्ष ठेऊन त्यात बदल करणे हे PCOS व्याधीवर मात करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यात जर बदल नाही केला तर PCOS बरा होणे कठिण आहे

अधिक माहितीसाठी संपर्क

डाँ.स्वप्निल बुरहानपुरकर

9860969192

।। श्री धंवन्तरी ।। आयुर्वेद व पंचकर्म क्लिनीक

डी-१, राजहंस सोसायटी, रंगोली हाँटेल समोर, टिळक नगर, चार रस्ता, डोंबिवली (पूर्व)

       SHREE DHANVANTRI AYURVED AND PANCHAKARMA CLINIC DOMBIVLI INDIA  | BOOK APPOINTMENT 


Comments

Doctor

Image Gallery with Captions and Links
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
May all sentient beings be at peace, may no one suffer from illness, May all see what is auspicious, may no one suffer. Om peace, peace, peace.

Total Pageviews