Skip to main content

Posts

One becomes serene, sinless, and passionless

Meditation Yoga Chapter 6, Verse 27 praśānta manasaṁ hyenaṁ yoginaṁ sukham-uttamam upaiti śānta rajasaṁ brahma-bhūtam akalmaṣam When the mind is completely quieted, then there comes upon the yogi the stainless, passionless, highest bliss of the soul that has become Brahman. By constantly revolving in the mind the idea that one is not the body, that one is Brahman; by constantly remembering that one is not what one sees externally, and instead one sees the Divine residing within, the sadhak, the bhakta gets firmly established in the identity of the Divine. Like this, the sadhak, the bhakta reaches an advanced stage in the path of union with the Divine. Such a bhakta rises above the gunas. “... the highest bliss of the soul that has become Brahman.” In this state, there is only the reflection of God, nothing else. There is no doubt, there is no judgement, there is nothing which will keep one imbalanced or in duality. One is fully absorbed in the Divine Self, so nothing can mo...

डिप्रेशन म्हणजेच नैराश्य..

काही सामान्य माहिती आणि घरगुती उपाय.. 1.मनाला येणारी सततची अस्वस्थता दीर्घ काळ व्यक्तीच्या आयुष्यात टिकली, तर त्याचे रूपांतर चिंतेमध्ये होऊ लागते. अशा वेळी पेशंट बऱ्याचदा डिप्रेशन च्या मार्गाने वाटचाल करताना दिसतात.  2.जीवनात कधी तरी निराश आणि उदास वाटन स्वाभाविक आहे, पण ही अवस्था दीर्घ काळापर्यन्त टिकून राहिली, आणि निरंतर तुम्ही उदासीन राहू लागलात म्हणजे ते डिप्रेशन असू शकत. 3.नकारात्मक विचारांमुळे शरीरात संप्रेरकांचे असंतुलन निर्माण होतात व स्वभाव धर्माच्या विरोधात अर्थात निसर्गाच्या विरोधात गेल्यामुळे मन नैराश्य ग्रस्त होत जातं. 4.डिप्रेशन मध्ये व्यसन कसलही लागू शकत.. 5.डिप्रेशन'चे प्रमाण सर्वांत जास्त महिलांमध्ये आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलताना त्यांना अनेक प्रसंगाना दररोज सामोरे जावे लागते.  6.नैराश्य (डिप्रेशन) हे अनुवांशिकतेमुळे येऊ शकते. तसेच ते बाह्य वातारणामुळेही येऊ शकते. यासाठी घरातील वातावरणही कारणीभूत असु शकते. 7.नैराश्य ग्रस्त व्यक्ति खूप झोपतो किंवा झोप उडालेली असते. कोणताही आवाज त्याला सहन होत नाही. बेचैन वाटते. आत्महत्येचे विचार मनात येतात. काही जण आत्महत्...

बहुगणी कांदा

उन्हाळ्यात ऊन लागते व अतिशय डोकेदुखी सुरू होते अशावेळी कांदा वाटून डोक्याच्या टाळूवर लावल्यास डोके दुखणे थांबते. नाकातून रक्त जात असल्यास ताबडतोब कांदा फोडून कमी चिरुन सुंघवावा. रक्त थांबते. सर्दी सारखी होऊन नाक वाहात असल्यास कांद्याच्या पाण्याचा वास घ्यावा. (कांदा किसून पिळून पाणी काढावे) तसेच जेवणात कांदा जास्त घ्यावा. कांदा गरम करून कुस्करून त्यातील पाणी काढावे व त्यात मीठ मिसळून ते पाणी पिण्यास द्यावे. पोटदुखी थांबते. उलटी होत असल्यास कांदा खाण्यास द्यावा किंवा कांद्याचा वास घेण्यास सांगावे. कान दुखत असल्यास कांदा, थोडासा गरम करून त्याचे पाणी काढून कानात टाकावे व कांद्याचे 2-3 थेंब गरम पाणी पिण्यास द्यावे. उन लागल्यास पूर्ण शरीरावर कांद्याचे पाणी (कांदा किसून पिळून पाणी काढावे.) लावावे. तळपाय, हात व कपाळाला लावावे. विंचू किंवा मधमाशा किंवा विषारी कीडा चावल्यास त्यावर कांद्याचे पाणी लावावे. कांद्याला वाटून ते पाण्यात मिसळून घरात शिंपडल्यास किडे, पिसवा व मुंग्या जातात. पागल पिसाळलेला कुत्रा चावला तर कांदा व तुरटी लावल्यास व कांद्याचे पाणी पिण्यास दिल्यास कुत्र्याचे विष कमी होते. कांद...

फिशर – एक जळजळीत वास्तव

‘मर्मबंधातील ठेव ही…’ ऐकताना स्वरसमाधी लागली होती. इतक्यात दारावर टक्‌टक्‌. ‘आत येऊ का रे?’ असं विचारताच सतीश आत शिरला. सतीश माझा बालपणापासूनचा मित्र. वयाने माझ्याहून दोन वर्षं लहान. आय.टी. इंजिनइर आणि एका यू.एस. बेस्ड कंपनीत चांगल्या पोस्टवर. गोरापान रंग, बेताची उंची, धारदार नाक, घारे डोळे, पिंगट केस थोडक्यात ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे काही चित्र उभं राहतं त्याच्याशी अगदी तंतोतंत जुळणारा असा सतीश. ‘काय रे, गेले दोन-तीन दिवस जीमला नाही आलास?‘ माझा प्रश्न. ‘जरा तब्येत बरी नाही रे.’ त्याने उभ्याउभ्याच उत्तर दिले. ‘ठीक आहे. जरा बसून सावकाश सांग काय होतंय ते.’ तो संकोचला. ‘नको, उभं राहूनच सांगतो.’ ‘अरे बाबा, घरी तुला घोडा म्हणतात, ते सिद्ध करायची गरज नाहीये. बस.’ मी माङ्गक विनोद केला. पण त्याचा चेहरा मात्र गंभीर झाला. ‘काय रे, काय होतय?’ ‘कसं सांगू रे? गेले तीन दिवस संडासच्या जागी प्रचंड दुखतंय, आग होते आणि थोडं रक्तपण पडतंय. मला टेन्शन आलंय. पाइल्स तर नसतील ना रे?’ अगदी काकुळतीला येऊन त्याने ‘मर्मबंधातील ठेव‘ उलगडली. त्याला धीर दिला. म्हटलं, ‘आपण आधी संडासच...

बेलफळ...

बेलफळ शरीराला शीतलता, मेंदूला तजेला व हृदयाला बळ प्रदान करते. अर्धे पिकलेले अर्धे कच्चे बेल फळ भूक व पचनशक्ती वाढविणारे तसेच जंतांचा नाश करणारे आहे. बेल व त्याच्या सरबताच्या सेवनाने उन्हाळ्यात उष्णतेचा भीषण प्रकोप सहन करण्याची शक्ती येते. उन्हाच्या झळा लागल्यावर बेलाच्या सरबतात लिंबाचा रस व थोडेसे मीठ घालून पाजावे. बेलाचे घरगुती उपाय... 1.बेलाचा १०-२० ग्रॅम गर खाल्ल्याने मासिक स्रावात कधीकधी अधिक प्रमाणात पडणारे रक्त नियंत्रित होते. 2.बेलाचा गर, लोणी व मध मिसळून दररोज सकाळ-सायंकाळ सेवन केल्याने शारीरिक शक्ती वाढते, धातू पुष्ट होतो. 3.रात्री १०-२० ग्रॅम बेलाचा गर पाण्यात भिजत टाकावा. सकाळी चांगले कुस्करून व गाळून घ्यावे. हे पाणी गरजेनुसार खडीसाखर मिसळून प्यावे. यात लिंबचा रसही टाकू शकता. यामुळे भूक चांगली लागते. 4.उन्हाळ्यात निम्न रक्तदाबाच्या रुग्णाचा जीव घाबरा झाल्यास थोडेसे सैंधव मीठ व आल्याचा रस मिसळून बेलाचे सरबत पाजल्याने खूप लाभ होतो. 5.१०-१० ग्रॅम बेलाचा गर व धणे तसेच ५ ग्रॅम बडीशेप रात्री पाण्यात भिजत टाकावी. सकाळी चांगले कुस्करून व गाळून सेवन केल्याने थोड्याच दिवसात स्वप्न दोष...

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Blogs

Total Pageviews