।। दास-वाणी ।। मृत्यू न म्हणे देसाई । मृत्यू न म्हणे वेवसायी । मृत्यू न म्हणे ठांईं ठांईं । पुंड राजे ।। मृत्यू न म्हणे मुद्राधारी । मृत्यू न म्हणे व्यापारी । मृत्यू न म्हणे परनारी । राजकन्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०३/०९/१४-१५ उपजे ते नाशे । जे निर्माण होते ते कधी न कधी नाश पावतेच. जातस्य हि धृवो मृत्यु: । जन्मलाय त्याला मृत्यू अटळ आहे. मृत्यू भेदभाव कधीच करत नाही. हा गावचा देसाई आहे याला जरा नंतर नेऊ. हा तर मोठा कारखानदार आहे. हा जागोजागी गुंडगिरी करत स्वत: जणु राजाच समजतोय. याला शिक्षा म्हणून थोडे आधी नेऊया. मुद्राधारी म्हणजे शिक्काधारी राजपत्रित अधिकारी. हा लोकांच्या उपयोगी पडतोय.दया दाखवूया याला. हा धनाढय व्यापारी आहे. याच्या जाण्याने मोठा कारभार ठप्प पडेल. ही परस्त्री आहे. ही तर राजकन्या आहे. हिला हात कसा लावायचा ? असा कोणताही भेदभाव मृत्यू कधीच करत नाही. सरतां संचिताचे शेष । नाहीं क्षणाचा अवकाश ।। प्रारब्धाचे ठरलेले चांगले वाईट भोग संपले, की क्षणाचाही वेळ जा...
Ayurveda Initiative for Global Health is for Ayurveda, Ayurvedic Doctor, Ayurvedic medicine, Ayurvedic treatment , Ayurvedic lifestyle , Ayurvedic diet , Ayurvedic wellness , Ayurvedic health , Ayurvedic remedies, Ayurvedic therapies , Panchakarma Therapy , Yoga , Meditation , Ayurvedic health tips , Ayurvedic tips for a healthy lifestyle , What is Ayurveda? , Ayurveda in India , Ayurvedic treatment centers in India , Rejuvinate Yourself with Ayurveda and Yoga.