मधुमेह टाळता येतो. आहार आणि व्यायाम यांच्या साह्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. कोणताही आजार हा होण्यापेक्षा जर टाळता आला तर? किंवा त्याचा प्रतबंध करता आला तर? मधुमेह हा आजार म्हणजे नुसतेच रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते असे नव्हे, तर हा आजार व्यक्तीचे शरीर पोखरून, चुंबकासारखे कार्य करतो व विविध आजारांना निमंत्रित करतो. उदा.- उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंडाचे रोग, न बरी होणारी जखम (Gangrene) इ. या आजाराची भीती बाळगण्यापेक्षा आणि तो आपणास होऊन शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाट पाहण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध केला तर? होय, शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे, की तुम्ही मधुमेह टाळू शकता किंवा त्याचा प्रतिबंध करू शकता. प्रतिबंध कसा करता येईल, हे पाहण्याआधी आपण मधुमेह होण्याची शक्यमता कोणाकोणास आहे हे विचारात घेऊ. आपल्या कुटुंबात मधुमेहाचा रुग्ण आहे. उदा.- आपली आई किंवा वडील किंवा दोघेही अथवा आपल्या कमरेचा घेर ८० सें.मी. (महिला) किंवा ९० सें.मी. (पुरुष) पेक्षा जास्त आहे. अथवा आपल्या व्यवसायाचे स्वरूप बैठ्या पद्धतीचे आहे अथवा आपले वय वर्षे ३५ पेक्षा जास्त आहे. असे असल्यास त्या व्यक्ती...
Ayurveda Initiative for Global Health is for Ayurveda, Ayurvedic Doctor, Ayurvedic medicine, Ayurvedic treatment , Ayurvedic lifestyle , Ayurvedic diet , Ayurvedic wellness , Ayurvedic health , Ayurvedic remedies, Ayurvedic therapies , Panchakarma Therapy , Yoga , Meditation , Ayurvedic health tips , Ayurvedic tips for a healthy lifestyle , What is Ayurveda? , Ayurveda in India , Ayurvedic treatment centers in India , Rejuvinate Yourself with Ayurveda and Yoga.