आहारातून मिळणाऱ्या उष्माकांपैकी १० टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी उष्मांक स्निग्ध पदार्थामधून आलेले असावेत. कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ वज्र्य करावेत. रोजच्या आहारातून ५ मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल खायला हरकत नाही, अगदी स्निग्धांशविरहित दुधातही (Skimmed Milk) मध्ये थोडेसे कोलेस्टेरॉल असते. संपृक्त स्निग्धांश (Saturated Fats) जवळजवळ वज्र्य करावेत. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याच्या दृष्टीनं उपयुक्त असलेले पदार्थ कांदा, लसूण, गाजर, वांगे, सोयाबीन, स्कीम मिल्क, दुधाचं दही, सफरचंद इतर नेहमी आहारात ठेवावे.
2. मांसाहार टाळावा. मटण, चिकन टाळावे. अंडय़ातील पिवळा भाग टाळावा. दुधाचे पदार्थ- मलई, तूप, लोणी, चीज, पनीर, मिठाई शक्यतो टाळावे. मिताहारी असावे. (Have a gentle hunger always)
3. सफरचंद नियमित सेवन केल्याने हृदयासाठी व रक्तवाहिन्यासाठी उपयुक्त ठरते. हे फायबर हृदय रोग टाळण्यासाठी मदत करते.
4. किमान पाच बदाम आणि चार अक्रोड नियमित खाल्ल्यामुळेही शरीराला पुरेसे फॅट, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम मिळते. बदाम खाल्ल्याने हृदयरोग किमान २० टक्क्यांइतका दूर ठेवता येतो. अक्रोडात व्हिटॅमिन-ई भरपूर असते. हृदयाच्या रक्षणासाठी ते खाणे फारच चांगले.
5. धान्य योग्य प्रकारचे असले तरीही हृदयविकार लांब ठेवता येतो. त्यामुळे धान्य चांगल्या प्रतीचे असायला हवे. गव्हासारख्या काही धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हृदयाच्या मजबुतीसाठी ते योग्यच आहेत.
6. ओट्स शरीरातील जादा कोलेस्ट्रोल घालवण्याचं काम नैसर्गिकरीत्या करतात. ओट्समुळे हृदयाचे कामही चांगल्या रीतीने चालते.
7. संपूर्ण शाकाहार हा आरोग्यदायी आहे.
8. चायनीज पदार्थ, तळलेले पदार्थ, पिझ्झासारखे पदार्थ, मैद्याचा अतिरेक टाळावा.
9. आहारात तंतुमय पदार्थाचे म्हणजेच (Fibre) प्रमाण पुष्कळ असावे.
10. मीठ आणि साखर आहारात कमी प्रमाणात वापरणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असते
11. भरपूर व्यायाम करावा. भराभरा चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवणे यांसारखे व्यायाम जितके वेळ सहज होईल तोपर्यंत करावा. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी व्यायामाचा वेळ आणि प्रकार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा. शरीरांतर्गत ऊर्जा दीर्घ काळासाठी, पण प्रमाणशीरपणे आणि योग्य गतीने वापरली जाते त्याला एरोबिक व्यायाम असे म्हणतात. असा व्यायाम हृदयविकार टाळण्यास मदत करतो. योगासने करावीत.
डॉ. श्री .नितिन जाधव .संजीवन चिकित्सक .डोंबिवली. 9892306092.
Comments
Post a Comment