Skip to main content

मधुमेह

मधुमेह टाळता येतो.
आहार आणि व्यायाम यांच्या साह्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.
कोणताही आजार हा होण्यापेक्षा जर टाळता आला तर? किंवा त्याचा प्रतबंध करता आला तर? मधुमेह हा आजार म्हणजे नुसतेच रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते असे नव्हे, तर हा आजार व्यक्तीचे शरीर पोखरून, चुंबकासारखे कार्य करतो व विविध आजारांना निमंत्रित करतो. उदा.- उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंडाचे रोग, न बरी होणारी जखम (Gangrene) इ. या आजाराची भीती बाळगण्यापेक्षा आणि तो आपणास होऊन शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाट पाहण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध केला तर?
होय, शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे, की तुम्ही मधुमेह टाळू शकता किंवा त्याचा प्रतिबंध करू शकता.
प्रतिबंध कसा करता येईल, हे पाहण्याआधी आपण मधुमेह होण्याची शक्यमता कोणाकोणास आहे हे विचारात घेऊ.
आपल्या कुटुंबात मधुमेहाचा रुग्ण आहे. उदा.- आपली आई किंवा वडील किंवा दोघेही अथवा आपल्या कमरेचा घेर ८० सें.मी. (महिला) किंवा ९० सें.मी. (पुरुष) पेक्षा जास्त आहे. अथवा आपल्या व्यवसायाचे स्वरूप बैठ्या पद्धतीचे आहे अथवा आपले वय वर्षे ३५ पेक्षा जास्त आहे. असे असल्यास त्या व्यक्तीस मधुमेह होण्याची शक्यहता नाकारता येत नाही. अशा व्यक्तींनी स्वतःहून तपासणी करून घेऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा. भविष्यात मधुमेह होण्याची शक्य ता असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पाहण्यापेक्षा, शरीर साखरेचा भार (लोड) सहन करू शकते किंवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे (Glucose Tolerance Test) - जेणेकरून ती व्यक्ती मधुमेही (Diabetic)आहे की मधुमेहाच्या पूर्वस्थितीत (Pre-diabetic)आहे हे जाणता येते. मधुमेहाच्या पूर्वस्थितीतील (Pre-diabetic) व्यक्तींनी नियंत्रित आहार व नियमित व्यायाम (Life Style Modification) -केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास व पूर्ववत येण्यासही मदत होते व मधुमेहाचा प्रतिबंध होतो. आहार व व्यायाम हे दोन्ही मधुमेहाच्या उपचारासाठीचे व प्रतबंधात्मक उपायासाठीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. नियंत्रित आहार म्हणजे काय? महाराष्ट्रीय मध्यमवर्गाचा आहार समतोल असला, तरी नियंत्रित नसतो. त्यास नियंत्रित करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. दिवसाचा पूर्ण आहार हा चार भागांत विभागून (सकाळचा नाश्ताी, दुपारचे जेवण, संध्याकाळी नाश्ता व रात्रीचे जेवण) घेतला पाहिजे.
आहाराच्या चारही भागांपैकी कोणताही भाग कमी केला अथवा टाळला जाऊ नये. बाह्य पदार्थाचे (fast food उदा.- पिझ्झा, बर्गर, वडा-पाव इ.) सेवन टाळावे. खाद्यतेलाचे सेवन मर्यादित स्वरूपात व मिश्रण करून केले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो इत्यादीचा वापर जास्त प्रमाणात करावा.
रात्रीचे जेवण व झोप यामध्ये किमान २-३ तासांचे अंतर असावे. अतिसेवन व कडकडीत उपवास- दोन्हीही टाळावे. आहारामुळे मिळालेल्या ऊर्जेचा (calories) योग्य वापर हा नियमित व्यायामामुळे होतो. व्यायाम सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. घरकाम, बागकाम, कार्यालयीन काम यामध्ये खर्च होणाऱ्या ऊर्जेपेक्षा कितीतरी जास्त ऊर्जा खर्च करणे गरजेचे असते. भरभर चालणे, पोहणे, योगासने, मैदानी खेळ (वैद्यकीय सल्ल्यानंतर) या प्रकारांनी हे साध्य होऊ शकते. नियमित व्यायाम हा दिवसातून ३०-४५ मिनिटे व आठवड्यातून कमीत कमी पाच वेळा करायला हवा.
नियंत्रित आहार व नियमित व्यायामाचे फायदे- वजन नियंत्रित राहते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. गुडघेदुखीचा त्रास कमी होतो, बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो. नियंत्रित आहार व नियमित व्यायाम या जीवनशैली बदलामुळे (Life-style modification) मधुमेहाचा प्रतिबंध होऊ शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनशैली बदलणे अवघड आहे, पण अशक्यमप्राय नाही. जीवनशैली बदलरूपी लसीने मधुमेहाचा प्रतिबंध करता येतो. दुर्दैवाने कोणत्याही औषधीनिर्मिती कंपनीला ही लस बनवता येत नाही, म्हणून ही लस आजच सर्वांनी स्वतःहून घेतली पाहिजे व मधुमेह झाल्यानंतर त्याच्याशी लढा देण्यापेक्षा मधुमेह होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक लढा दिला पाहिजे.

आपले वजन जास्तच असेल 

थकवा चकवा 
चक्कर येणे तहान खुप लागणे घसा कोरडा पडणे खुप भुक लागणे
रात्री जास्तच लघवी जाने लघवी त जळजळ होणे 
नि्रउर्त्साह अशी लक्षण 
जाणवत असेल तर 
आपली रक्तातील साखर 
तपासून घ्या घाबरुन जाऊ नका 
आणि त्वरीत डॉक्टर चा सल्ला घ्या 

श्री .डॉ. नितीन जाधव .संजीवन चिकित्सक .डोंबिवली. 9892306092.

Comments

Latest Post

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Total Pageviews