Skip to main content

Posts

Showing posts from May 23, 2024

डिप्रेशन म्हणजेच नैराश्य..

काही सामान्य माहिती आणि घरगुती उपाय.. 1.मनाला येणारी सततची अस्वस्थता दीर्घ काळ व्यक्तीच्या आयुष्यात टिकली, तर त्याचे रूपांतर चिंतेमध्ये होऊ लागते. अशा वेळी पेशंट बऱ्याचदा डिप्रेशन च्या मार्गाने वाटचाल करताना दिसतात.  2.जीवनात कधी तरी निराश आणि उदास वाटन स्वाभाविक आहे, पण ही अवस्था दीर्घ काळापर्यन्त टिकून राहिली, आणि निरंतर तुम्ही उदासीन राहू लागलात म्हणजे ते डिप्रेशन असू शकत. 3.नकारात्मक विचारांमुळे शरीरात संप्रेरकांचे असंतुलन निर्माण होतात व स्वभाव धर्माच्या विरोधात अर्थात निसर्गाच्या विरोधात गेल्यामुळे मन नैराश्य ग्रस्त होत जातं. 4.डिप्रेशन मध्ये व्यसन कसलही लागू शकत.. 5.डिप्रेशन'चे प्रमाण सर्वांत जास्त महिलांमध्ये आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलताना त्यांना अनेक प्रसंगाना दररोज सामोरे जावे लागते.  6.नैराश्य (डिप्रेशन) हे अनुवांशिकतेमुळे येऊ शकते. तसेच ते बाह्य वातारणामुळेही येऊ शकते. यासाठी घरातील वातावरणही कारणीभूत असु शकते. 7.नैराश्य ग्रस्त व्यक्ति खूप झोपतो किंवा झोप उडालेली असते. कोणताही आवाज त्याला सहन होत नाही. बेचैन वाटते. आत्महत्येचे विचार मनात येतात. काही जण आत्महत्...

बहुगणी कांदा

उन्हाळ्यात ऊन लागते व अतिशय डोकेदुखी सुरू होते अशावेळी कांदा वाटून डोक्याच्या टाळूवर लावल्यास डोके दुखणे थांबते. नाकातून रक्त जात असल्यास ताबडतोब कांदा फोडून कमी चिरुन सुंघवावा. रक्त थांबते. सर्दी सारखी होऊन नाक वाहात असल्यास कांद्याच्या पाण्याचा वास घ्यावा. (कांदा किसून पिळून पाणी काढावे) तसेच जेवणात कांदा जास्त घ्यावा. कांदा गरम करून कुस्करून त्यातील पाणी काढावे व त्यात मीठ मिसळून ते पाणी पिण्यास द्यावे. पोटदुखी थांबते. उलटी होत असल्यास कांदा खाण्यास द्यावा किंवा कांद्याचा वास घेण्यास सांगावे. कान दुखत असल्यास कांदा, थोडासा गरम करून त्याचे पाणी काढून कानात टाकावे व कांद्याचे 2-3 थेंब गरम पाणी पिण्यास द्यावे. उन लागल्यास पूर्ण शरीरावर कांद्याचे पाणी (कांदा किसून पिळून पाणी काढावे.) लावावे. तळपाय, हात व कपाळाला लावावे. विंचू किंवा मधमाशा किंवा विषारी कीडा चावल्यास त्यावर कांद्याचे पाणी लावावे. कांद्याला वाटून ते पाण्यात मिसळून घरात शिंपडल्यास किडे, पिसवा व मुंग्या जातात. पागल पिसाळलेला कुत्रा चावला तर कांदा व तुरटी लावल्यास व कांद्याचे पाणी पिण्यास दिल्यास कुत्र्याचे विष कमी होते. कांद...

फिशर – एक जळजळीत वास्तव

‘मर्मबंधातील ठेव ही…’ ऐकताना स्वरसमाधी लागली होती. इतक्यात दारावर टक्‌टक्‌. ‘आत येऊ का रे?’ असं विचारताच सतीश आत शिरला. सतीश माझा बालपणापासूनचा मित्र. वयाने माझ्याहून दोन वर्षं लहान. आय.टी. इंजिनइर आणि एका यू.एस. बेस्ड कंपनीत चांगल्या पोस्टवर. गोरापान रंग, बेताची उंची, धारदार नाक, घारे डोळे, पिंगट केस थोडक्यात ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे काही चित्र उभं राहतं त्याच्याशी अगदी तंतोतंत जुळणारा असा सतीश. ‘काय रे, गेले दोन-तीन दिवस जीमला नाही आलास?‘ माझा प्रश्न. ‘जरा तब्येत बरी नाही रे.’ त्याने उभ्याउभ्याच उत्तर दिले. ‘ठीक आहे. जरा बसून सावकाश सांग काय होतंय ते.’ तो संकोचला. ‘नको, उभं राहूनच सांगतो.’ ‘अरे बाबा, घरी तुला घोडा म्हणतात, ते सिद्ध करायची गरज नाहीये. बस.’ मी माङ्गक विनोद केला. पण त्याचा चेहरा मात्र गंभीर झाला. ‘काय रे, काय होतय?’ ‘कसं सांगू रे? गेले तीन दिवस संडासच्या जागी प्रचंड दुखतंय, आग होते आणि थोडं रक्तपण पडतंय. मला टेन्शन आलंय. पाइल्स तर नसतील ना रे?’ अगदी काकुळतीला येऊन त्याने ‘मर्मबंधातील ठेव‘ उलगडली. त्याला धीर दिला. म्हटलं, ‘आपण आधी संडासच...

बेलफळ...

बेलफळ शरीराला शीतलता, मेंदूला तजेला व हृदयाला बळ प्रदान करते. अर्धे पिकलेले अर्धे कच्चे बेल फळ भूक व पचनशक्ती वाढविणारे तसेच जंतांचा नाश करणारे आहे. बेल व त्याच्या सरबताच्या सेवनाने उन्हाळ्यात उष्णतेचा भीषण प्रकोप सहन करण्याची शक्ती येते. उन्हाच्या झळा लागल्यावर बेलाच्या सरबतात लिंबाचा रस व थोडेसे मीठ घालून पाजावे. बेलाचे घरगुती उपाय... 1.बेलाचा १०-२० ग्रॅम गर खाल्ल्याने मासिक स्रावात कधीकधी अधिक प्रमाणात पडणारे रक्त नियंत्रित होते. 2.बेलाचा गर, लोणी व मध मिसळून दररोज सकाळ-सायंकाळ सेवन केल्याने शारीरिक शक्ती वाढते, धातू पुष्ट होतो. 3.रात्री १०-२० ग्रॅम बेलाचा गर पाण्यात भिजत टाकावा. सकाळी चांगले कुस्करून व गाळून घ्यावे. हे पाणी गरजेनुसार खडीसाखर मिसळून प्यावे. यात लिंबचा रसही टाकू शकता. यामुळे भूक चांगली लागते. 4.उन्हाळ्यात निम्न रक्तदाबाच्या रुग्णाचा जीव घाबरा झाल्यास थोडेसे सैंधव मीठ व आल्याचा रस मिसळून बेलाचे सरबत पाजल्याने खूप लाभ होतो. 5.१०-१० ग्रॅम बेलाचा गर व धणे तसेच ५ ग्रॅम बडीशेप रात्री पाण्यात भिजत टाकावी. सकाळी चांगले कुस्करून व गाळून सेवन केल्याने थोड्याच दिवसात स्वप्न दोष...

मानेच्या मणक्‍याचा स्पॉंडिलायसीस

संधी म्हणजे दोन अवयवयांना सांधणारे अवयव. पण यात वात झाला किंवा चुकीच्या पद्धतीने हलचाल झाली की त्या अवयवाची पुरती बोंब लागते. कधीकधी हे आयुष्यभराचे दुखणे होते. त्यात स्पॉंडिलायसीस झाले की संपलेच सगळे. उठता बसता मानेवर, पाठीवर कुत्र्याचा पट्टा बांधल्यासारखा पट्टा बांधावा लागतो. पण हा आजार नेमका कसा होतो आणि त्यावर उपचार काय आहेत हे आपण आज जाणून घेऊया. घर्षणाने जीर्णशीर्ण झालेला वयोमानाने उद्‌भवणारा मानेचा आजार म्हणजेच सर्व्हायकल स्पॉंडिलायसीस. सर्वप्रथम हा आजार सुरू होताना दोन मणक्‍यांच्या मध्ये असणारी गादी (डिस्क)मधील पाण्याचे प्रमाण कमी होण्यास सुरू होते. त्यामुळे त्यातील असणारे कार्टीलेज मणक्‍याच्या बाहेर निघून मज्जारज्जूवर दबाव टाकायला सुरुवात करते. अगोदरच मज्जारज्जू हा मणक्‍यातील एका छोट्या कॅनेलमधून कंबरेपर्यंत खाली गेलेला असतो. त्यावर मणक्‍यातून ही गादी सरकल्यामुळे मान दुखणे व त्याच प्रमाणे एक किंवा दोन्ही हातांमध्ये वेदना होणे, हातांमध्ये मुंग्या येणे व सुन्नपणा येणे अशी लक्षणे दिसून येतात. गादी सरकण्याची (स्लीप डिस्क) कारणे *अचानक मानेला झटका लागणे. * स्थूलपणा * मणक्‍याला झालेल...

गुणकारी जास्वंद

१) काही जणांना केसांना तेल लावायला आवडत नाही. त्यांनी जास्वंदाची १० ते १५ फुलं लोखंडाच्या कढईत थोड्या पाण्यात भिजवावीत. रात्री ते पाणी चांगला अर्क निघेपर्यंत उकळून घ्यावं. सकाळी उठल्यावर तो अर्क केसांना लावा. एकातासाने फक्त पाण्याने केस धुऊन टाकावेत. यामुळे केसांना चांगली चमक येते. २) हेड मसाजसाठी जे तेल वापरत असाल त्यात, उदाहणार्थ तिळाच्या अथवा खोबरेल तेलात पाच ते सहा जास्वंदाची फुलं टाकावी. हे तेल कोमट करून कापूस किंवा बोटांऐवजी जास्वंदीच्या फुलांनी केसांच्या मुळांना चोळलं तर केसांची मुळं मजबूत होतात. ३) भरपूर जास्वंदाची फुलं, दोन आवळे, थोडी शिकेकाई आणि दोन रिठे पाण्यात टाकून ते मिश्रण व्यवस्थित उकळवून ठेवा. केसांसाठी हेअरवॉश म्हणून वापरता येईल. हा हेअरवॉश रोज वापरला तरी चालेल. ४) मोड आलेली मेथी, कोरफड चिक, जास्वंदाची फुलं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटावी. हा पॅक केसांना लावावा. याने केसांना नैसगिर्क चमक येते. ५) जास्वंदीची फुलं, कोरफडीची पानं, ५० मिलि राईचं तेल आणि ५० मिलि तिळाचं तेल एकत्र गरम करून ठेवावं. शक्यतो काचेच्या बाटलीत हे तेल भरून ठेवून वापरावं. आठवड्यातून दोनदा तरी हे ...

This is will power, the strength of the mind

Meditation Yoga Chapter 6, Verse 26 yato yato niścarati manaś-cañcalam asthiraṁ tatas-tato niyamyaitad ātmanyeva vaśaṁ nayet Whenever the restless and unquiet mind goes forth, it should be controlled and brought into subjection in the Self. The mind is always restless, always jumping from one thought to the other, from one ‘want’ to the other. When the mind focuses on a particular object, it’s only for a short period of time. It doesn’t last long. When one wants something, one has already created it in the mind; and when it is created in the mind, automatically, with determination, it gets manifested outwardly. This is will power, the strength of the mind. But whatever is created from the mind’s wants, doesn’t satisfy one for long. The enjoyment is only for a short time. For instance, somebody buys a nice car. For one month, they will treat the car like nothing else they’ve had before. They will clean it and keep it so beautiful! But after sometime, when the mind gets bored...

Become single-pointed and identify itself with God

Meditation Yoga Chapter 6, Verses 24-25 saṅkalpa prabhavān kāmān tyaktvā sarvān-aśeṣataḥ manasaivendriya-grāmaṁ viniyamya samantataḥ śanaiḥ śanairu-paramed buddhyā dhṛti-gṛhītayā ātma-saṁsthaṁ manaḥ kṛtvā na kiñcid-api cintayet Renouncing without reserve all desires born of the imagination, and completely restraining all the senses by the mind from all directions; very gradually, one should attain tranquillity, with the help of the intellect held by a firm resolution. Having focused the mind on the Self, one should think of nothing else. Here Lord Krishna explains how to control the senses and the mind and fix the mind on God. The nature of the senses is to run after sense objects. However, the senses can only apprehend an object when they succeed in carrying the mind with them. When the mind is weak, the senses easily succeed in dragging the mind with them and the mind easily gets lost. But, when the mind attains single-pointedness with the help of the meditation of a puri...

All boredom and judgement will automatically disappear

Meditation Yoga  Chapter 6, Verse 23 taṁ vidyād duḥkha saṁyoga  viyogaṁ yoga saṁjñitam  sa niścayena yoktavyo  yogo ‘nirviṇṇa cetasā It is the putting away of the contact with pain, the divorce of the mind’s marriage from grief. The firm winning of this spiritual bliss is yoga, divine union. This yoga is to be resolutely practised without yielding to any discouragement by difficulty or failure. Even if a yogi has attained God-Realisation, his body, senses and mind still carry on doing all their activities. The body appears the same, but in one’s consciousness, deep within, one is not attached to anything; this is the divorce of the mind from grief. One doesn’t perceive the duality and by winning “this spiritual bliss”, one enters into the supreme state of divine union, where the soul is marrying Narayana, where the soul perceives Him as the only Man. The gopis told Krishna, “You are the only Man. There is no other Man but You. Everything else is just your creation, y...

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Blogs

Total Pageviews