ज्यासीं त्यासी कळकटा । स्वयें सदाचा चोरटा । परघातकी धाटामोटा । वाटा पाडी ।।


।। दास-वाणी ।। 

ज्यासीं त्यासी कळकटा । 
स्वयें सदाचा चोरटा । 
परघातकी धाटामोटा । 
वाटा पाडी ।। 

दीर्घ सूचना असेचिना । 
न्याय नीति हे रूचेना । 
परअभिळासीं वासना । 
निरंतर ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १९/०३/०९-१० 

कळकटा म्हणजे कलहकर्ता. भांडकुदळ.
हा करंटा दिसेल त्याच्याशी भांडण उकरून काढतो.
चोरूनच सगळया गोष्टी करणार.
इतकेच नव्हे कपटाने दगाफटका करणे हा
याचा हातखंडा.
यापलीकडेही जाऊन निर्लज्ज धिटाईने हा
वाटमाऱ्या देखील करायला मागेपुढे पहात नाही.

गावगुंडासारखेच वर्तन असल्याने या करंटयाकडे
दूरदर्शित्व, न्याय नीतीचा आदर वगैरे चांगल्या 
गोष्टीचा खडखडाटच असतो.
शिवाय दिसेल ती प्रत्येक गोष्ट याला हवीच असते.
त्यामुळे दुसऱ्याच्या संपत्ती मालमत्तेवर कायम
याचा डोळा असतो.
असा कुबुद्धी वासनेने लिडबिडलेला करंटा 
समाजाला लागलेली कीड असतो.

करंटलक्षण समास.

Comments

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Total Pageviews