*पंचकर्म : स्वास्थ टिकविणे साठी एक वरदान*
*पंचकर्म : स्वास्थ टिकविणे साठी एक वरदान*
हा उपचाराचा एक भाग आहे. हा एक प्रतिबंधक उपाय असून आयुर्वेदातील प्रभावी शस्त्र आहे. आयुर्वेदाचा भर प्रथम निरोगी असण्यावर आहे. जर तुमच्या प्रकृतीत बिघाड असेल तर तो कसा बरा करावयचा हा आयुर्वेदाचा दुसरा भाग आहे. तुमच्या भोवतालचे वातावरण तुमचे आरोग्य व शरीरावर परिणाम करते. म्हणून पंचकर्म आवश्यक आहे.
जर शरीरातून दूषित दोष काढून टाकल्यास कोणत्याही रोगाचे उच्चाटन होते. जर पंचकर्माची तत्त्वे योग्यप्रकारे आचरणात आणली तर वातावरणातील(Seasonal changes) बदलाचे तुमच्या शरीरावर अपायकारक परिणाम होणार नाहीत किंवा ते मोठया प्रमाणात कमी होतील.
वमन,विरेचन ,वस्ती ,नस्य, व रक्तमोक्षन या पाच उपचारांना पंचकर्म म्हणतात.
ही प्रतिबंधक उपाय किंवा सकारात्मक आरोग्यास प्रोत्साहन देणारे म्हणून वापरता येतो. एकदा दोष शरीरातून बाहेर फेकला की तो शरीरावर परिणाम करणार नाही. नंतर चांगले आरोग्य ठेवण्यासाठीचे उपचार घ्या. हे एखादी भिंत रंगवण्यासारखे आहे. रंगाचा नवा थर देण्यापूर्वी जुना रंग तुम्ही खरडून काढता, अशाप्रकारे पंचकर्माचा वापर करून शरीरातील अपायकारक घटक बाहेर टाकले जातात. म्हणून पंचकर्माला शुध्दिकर्म (सफाई) म्हणतात. त्यानंतर शरीर औषध योजनेला जास्त प्रतिसाद देईल व अधिक चांगला परिणाम होईल.
अधिक माहितीसाठी संपर्क
डाँ.स्वप्निल बुरहानपुरकर
9860969192
।। श्री धंवन्तरी ।। आयुर्वेद व पंचकर्म क्लिनीक
डी-१, राजहंस सोसायटी, रंगोली हाँटेल समोर, टिळक नगर, चार रस्ता, डोंबिवली (पूर्व)
SHREE DHANVANTRI AYURVED AND PANCHAKARMA CLINIC DOMBIVLI INDIA | BOOK APPOINTMENT
Comments